Advertisement

नागपूर: गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिराचे दरवाजे सोमवारी उघडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरच बंद असल्याने भाविक यात्रेकरू दशर््ानापासून वंचित झाले होते.
साडेतीन मुहुतार्पैकी एक मुहुर्त असलेला दिवाळीचा पाडवा, भगवान शिवशंकराचा वार सोमवार अशा दिवशी विघ्नहर्त्याचे मंदिर उघडल्याने गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असुन नगरवासियांची दिवाळी देखील गोड झाली आहे. देवस्थान ट्रस्टने दर्शनाबाबत एक नियमावली केली आहे.