
या घटनेची माहिती मिळताच सोमवारी संतप्त नागरिकांनी धीरेंद्र भोतमांगे या आरोपीच्या घरावर दगडफेक केली आणि बाहेर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान केले. सोमवारी अटक केल्यानंतर तो आता पाचपावली पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहे. माहितीनुसार, भोतमांगे बॅनर आणि पोस्टर बनवण्याच्या दुकानात काम करायचा रविवारी जेव्हा त्याचे कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेर गेले होते तेव्हा त्याने पिडीत चिमुकलीला त्याच्या घरी नेले. चिमुकली त्याला आजोबा म्हणायची तसेच आरोपी भोतमांगे हा एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. त्याचा भाऊ वरिष्ठ सरकारी अधिकारी आहे, तर जावई रेल्वेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, भोतमांगेच्या राहत्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून त्याचा गैरकृत्य संशयाच्या पलीकडे स्पष्टपणे दिसून येते. या घटनेसंदर्भात पीडित चिमुकलीने तिच्या आईला दिली.त्यानंतर तिच्या आई वडिलांनी भोतमांगे यांच्या घरी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेचे त्या ठिकाणी येण्याचे चित्रणही कैद झाले आहे.
पाचपावली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबूराव राऊत यांनी सांगितले की, पीडित तरुणी तिच्या आईसह सोमवारी तक्रार दाखल करण्यासाठी आली. याप्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपी भोतमांगेला अटक करण्यात आली आहे. तसेच परिसरात तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी आरोपीच्या निवासस्थानाजवळील गस्त देखील वाढवली आहे, राऊत यांनी सांगितले.








