Published On : Tue, Dec 25th, 2018

भव्य शोभायात्रेने महानुभाव पंथीय भव्य मेळाव्याची सुरूवात

भव्य शोभायात्रेने परिसरातील नागरिक मंत्रमुग्ध झाले .

कन्हान : – श्री दत्तप्रभू जयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताह व राज्यस्तरीय भव्यदिव्य महानुभाव पंथीय मेळाव्याचे आयोजन श्रीकृष्ण मंदिर पंचकमेटी टेकाडी (को. ख) नागपूर जिल्हा महानुभाव मंडळ व सावनेर तालुका महानुभाव मंडळ आणि टेकाडी ग्रामस्थ्य मंडळी यांच्या सयुक्त विदमाने आयोजित करून कन्हान ते टेकाडी भव्य शोभायात्रा काढुन महानुभाव पंथीय भव्य मेळाव्याची सुरूवात करण्यात आली.

परब्रम्ह परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या कृपाप्रसादे, वैराग्यमूर्ती कै.प. पु.प.म श्री शेवातकर बाबा महानुभाव यांच्या प्रेरणेने , श्रध्देय गुरुजन , आचार्य, यांचे शुभचिंतन व वासनिक, नामधारक मंडळींच्या सहयोगाने ३३व्या महानुभाव पंथीय भव्य मेळाव्याची सुरूवात सोमवार (दि.२४) ला सायंकाळी ४ वाजता कन्हान पोलीस स्टेशन पासुन भव्य दिव्य श्रीप्रभूंची पालखी व रथ, समुह नुत्य, सुंदर पंच अवतार मुर्ती , श्रध्देय गुरुजन , आचार्य, वासनिक, नामधारक मंडळींसह डिजे च्या गर्जरात आणि श्री चंक्रधर प्रभु च्या जयघोषात शोभायात्रा काढुन नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने पायदळ शोभायात्रा कन्हान- कान्द्री-मुख्य मार्गाने टेकाडी गावात श्रीकृष्ण मंदिर परिसरात पोहचुन भव्य सभा मंडपात रात्री ८ वाजता सर्वज्ञ स्वरांगण म्युझिकल ग्रुप नागपूर द्वारा भजन संध्या कार्यक्रम सादर करून राज्य स्तरीय महानुभाव पंथीय भव्य मेळाव्याची सुरूवात करण्यात आली.


महानुभाव पंथाच्या भव्य दिव्य शोभायात्रेचे कन्हान, कांद्री, टेकाडी येथील भाविकांनी जागो जागी चौकात पुष्पगुच्छ, पुष्पहार पुष्पानी स्वागत केले .