Published On : Wed, Apr 28th, 2021

सर्व जिल्ह्यात जोमाने कार्य करण्याची राज्यपालांची रेड क्रॉस संस्थेला सूचना

करोनाच्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. २७) भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरस्थ माध्यमातून चर्चा केली.

राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रेड क्रॉस संस्थेने अधिक सक्रियतेने काम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. मास्क वाटप, करोनाविषयक जनजागृती, लसीकरण आदी कार्यात रेड क्रॉस संस्थेने सहभागी होण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे महासचिव तेहमुरस्प सकलोथ यांनी संस्थेतर्फे राज्यात केल्या जात असलेल्या कार्याची राज्यपालांना माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष होमी खुस्रोखान हे देखील यावेळी उपस्थित होते.