Published On : Fri, Apr 10th, 2020

सरकारी धान्य दुकान काळाबाजारा ची आमदार जैस्वालने घेतली दखल.

कन्हान : – परिसरातील सरकारी सस्त धान्य दुकानात लॉकडाऊन काळात सु ध्दा काळाबाजार होत असल्याच्या तक्रा रीवरून आमदार जैस्वालने दखल घेत नागरिकांच्या होणा-या फसवणुक व लुटी मुळे दुकान संचालकांस चांगले फटकार त गैर प्रकार करणा-या दुकानाचे परवाना रद्द करण्यास तहसिलदार सहारे यांना सांगितले.

संपुर्ण देशात कोरोना विषाणुच्या पाश्वभुमिवर २१ दिवसाच्या लॉकडाऊन मुळे कामधंदे बंद असल्याने गौर गरिब व सर्वसामान्य नागरिक सरकारी सस्तधान्य दुकानात मोठया प्रमाणात धाव घेतआहे. परंतु या दुकान संचालका कडुन फक्त एका महिन्याचे तांदुळ, गहु जास्तीचे पैसे घेऊन देत असुन तेही कमी धान्य देणे, पावती न देणे, मिलावट, दुकान पुर्ण वेळ चालु न ठेवणे आदी नागरिकांच्या तक्रार होत असल्याने श्रेत्राचे आमदार आशिष जैस्वाल यांनी दौरा काढुन पाहणी केली असता यात सत्यता आढळुन आली.

टेकाडी ग्राम पंचायत अंतर्गत कोळसा खदान नं.३ येथे शिधापत्रिका धारकांच्या रांगा होत्या व खदान नं.६ येथे एकाच जागी दोन दुकाने असुन बंद असल्याने दुकान संचालकास बोलावुन नागरिकां च्या धान्याची चोरी व केलेली फसवणु कीची माफी मागण्यास सांगितले तसेच नागरिकांना हक्काचे धान्य व्यवस्थित मिळवुन घेण्याबाबत मार्गदर्शन केले. सोबत असलेले तहसिलदार वरूण कुमार सहारे हयांना यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यास सांगितले .

मा तहसिलदार सहारे हयानी दुरध्वनी वरून सांगितले की, कोळशा खदान न ३ व ६ च्या सरकारी सस्वत धान्य दुकाना वर कार्यवाही करण्यात येत असुन कांद्री, कन्हान व परिसरातील दुकान संचालका स नोटीस देऊन नागरिकांना व्यवस्थित धान्य वाटप करण्यात यावे. तक्रार प्राप्त झाल्यास कठोर कार्यवाही करण्यात येई ल अशी ताकीद देण्यात आली असल्या चे सांगण्यात आले.