Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Apr 10th, 2020

  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शनिवारी साधणार संवाद

  कोविड-१९ संदर्भात प्रश्न विचारण्याचे आवाहन


  नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी (ता.११) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दुपारी २ वाजता आयुक्त फेसबुक लाईव्ह येतील. नागरिकांनी कोविड-१९ म्हणजे कोरोना संदर्भातील आपल्या काही शंका, अडचणी, तक्रारी अथवा प्रश्न फेसबुक लाईव्हद्वारे विचारावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहेत.

  मनपा आयुक्तांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधण्यासाठी @ShriTukaramMundhe या मनपा आयुक्तांच्या फेसबुक अकाउंटशी कनेक्ट होता येईल.

  यासोबतच @nmcngp या नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून आणि @smartcitynagpur या स्मार्ट सिटीच्या फेसबुक पेजवरूनही संवाद साधता येईल, नागरिकांनी कोव्हिड-१९ संदर्भात प्रशासनातर्फे होत असलेल्या उपाययोजना, अंमलबजावणी आणि मदतीसंदर्भात प्रश्न इनबॉक्सच्या माध्यमातून विचारावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145