नवी दिल्ली : गेल्या अनेक आठवड्यांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी आज राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
नीट परीक्षा अनियमितता आणि शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाच्या मागणीवरून कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आणि हजारो विद्यार्थ्यांनी देशव्यापी आंदोलन छेडले होते. “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही,” ही भूमिका आंदोलनकर्त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली होती.
सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आजारपणातही आंदोलन सुरू ठेवले. अखंड आंदोलन, उपोषण आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला आणि अखेर शिक्षणमंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातील आंदोलनकर्त्यांनी जल्लोष साजरा केला असून, “हा एका व्यक्तीचा पराभव नाही, तर विद्यार्थ्यांच्या एकतेचा विजय आहे,” अशी प्रतिक्रिया सीजेपीकडून देण्यात आली.





