Published On : Mon, Nov 16th, 2020

उघडले गड मंदिराचे द्वार! आठ महिन्यां नंतर झाले श्री दर्शन!

Advertisement

ज्येष्ठ नागरिक , लहान मुले, गर्भवतीना प्रार्थनास्थळे जाणे टाळण्याचे आव्हानं …

रामटेक : कोरणा संक्रमण पसरू नये म्हणून गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले धार्मिक स्थळे राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवार,दिनांक १६. नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आली. रामटेकच्या ऐतिहासिक गडावरील प्रभू श्रीरामचंद्र स्वामीं मंदिराचे मुख्य द्वार पहाटेच्या पारंपरिक काकड आरती दरम्यान सर्व भावी भक्तांसाठी उघडण्यात आले आहे.

या प्रसंगी रामटेक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दिलीप ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त राखून येणाऱ्या भक्तांना कोरोंना विषयक नियमाचे पालन करायला लावले.
प्रभाकर महाजन आणि प्रकाश कस्तुरे यांच्या पुढाकाराने स्थानिक विठ्ठल मंदिरा पासून गड मंदिरा पर्यंत दर वर्षी प्रमाणे दिंडी काढण्यात आली.

श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी श्री मुकुंद महाराज आणि लक्ष्मण मंदिराचे पुजारी श्री अविनाश महाराज यांचे द्वारा आरती व तदनंतर चे ध्यान इत्यादी विधी संपन्न करण्यात आले.

या प्रसंगी मंदिर परिसरात शेकडो भाविकांनी पहाटे ४.३० पासून उत्साह पूर्वक उपस्थिती नोंदवली. काकड आरती भक्त परिवार सहित अनेक भाविकांनी मंदिराचे द्वार खुले झाल्या बद्दल आनंद व्यक्त केला आहे.

विशेष बाब म्हणजे मंदिराचे दरवाजे बंद असताना देखील भाविकांच्या द्वारे पायऱ्यांवर तर पूजारी मंडळी द्वारे मंदिरात आरतीची परंपरा कायम राखली गेली.

मात्र कोरोनाच्या पार्श्व भूमीवर या वर्षी दीपावली निमित्याने होणाऱ्या महा आरती चे आयोजन नेहमी प्रमाणे भव्य प्रमाणात होवू शकले नाही.

या नंतर त्रिपुर पौर्णिमा पर्यंत नियमित काकड आरती होत राहील,अशी माहिती सूत्रांकडून कळते.