Published On : Sat, May 9th, 2020

कन्हान आरोग्य केंद्राचा ढिसाळपणा चव्हाटय़ावर

रेफर महिलेची हाकेच्या अंतरावर प्रसुती.

कन्हान :- दिवस पूर्ण झाल्यामुळे व प्रसु तीच्या कळा सुरू झाल्यावर सुरक्षित व निरोगीमय प्रसुती होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रसुती गुंतागुंतीची असल्याचे कारण देत नागपुर ला रेफर केले. तिच प्रसुती हाकेच्या अंत रावर रूग्णवाहिकेत सुरक्षित झाल्याने आरोग्य विभागाचा गलथानपणा समोर आला आहे. हा संतापजनक प्रकार घड ला आहे कन्हान येथील प्राथमिक आरो ग्य केंद्राच्या निष्काळजीपणामुळे.

पंचशिल नगर सत्रापुर येथील मांग गारोडी समाजातील अंत्यत गरीब परि स्थितील सौ पुजा बॉबी गायकवाड (वय २३ वर्ष) हिला तीन वर्षाचा कौशिक ना वाचा मुलगा आहे. पहिली पसुती नार्मल झाली होती. या महिलेस दुस-या प्रसुती च्या कळा येत असल्याने प्राथमिक आरो ग्य केंद्र कन्हान येथे बुधवारी (दि.६)सायं ७ वाजता आणले. त्यावेळी आरोग्य केंद्रात उपस्थित कर्मचा-यांनी गर्भवती बाईला बाहेरच बसवून ठेवत कागदपत्रां ची औपचारिक पाहणी केली.

प्रसुतीला वेळ आहे कशाला आणले? गर्भातील बाळ कमी वजनाचे असल्याने येथे प्रसु ती करता येणार नाही? असा दम भरत कुठलीही तपासणी न करता त्या महिले ला नागपूरला पाठविण्याचा घाट घातला . महिलेच्या असह्य वेदना पाहून आशा वर्कर्स व एक नातेवाईक महिलासह रुग्ण वाहिकेने नागपुर दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. रूग्णवाहिकेने दवाखान्या पासून अवघे २०० मीटरही अंतर पार केले नसेल.

अगदी हाकेच्या अंतरावरील पोलीस स्टेशन जवळच रात्री ८.३० वाज ता दरम्यान महिलेची प्रसुती होऊन गोंड स बाळाला जन्म दिला. त्यामुळे लागली च रुग्णवाहिका परत प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आली. आता पर्यंत प्रा थमिक आरोग्य केंद्रा तर्फे झालेला प्रताप कमी होता की काय प्रसुती झालेल्या महिलेस रुग्णवाहिकेतून व्हील चेअरवर न नेता पायदळच वार्डात नेऊन दाखल करण्यात आले. पहिल्यांदा प्रसुतीला टाळाटाळ नंतर कमी वजनाचे कारण, रुग्ण दाखल करण्यास नकार, रुग्णा सोबत बेजबाबदार वागणूक देण्याचा प्रताप प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्य कीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी नगराध्यक्षा करूणा आष्टणकर यांना बोलावुन घटनेची आपबीती सांगितली. दवाखान्यातील अशा बेजबाबदार वागणू कीमुळे गायकवाड कुटुंबियांनी रात्रभर दवाखान्यात राहुन गुरूवारी (दि.७) सकाळी बाळ व बाळंतीण दोघांनाही घरी घेऊन गेले.

कन्हान शहर व परिसरातील गावा करिता नागपुर जबलपुर महामार्गा वरील प्राथमिक आरोग्य केंद्र असुन लॉकडाऊ न काळात सुध्दा येणा-या रूग्णाची गैर सोय होत असल्याने येथिल आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांच्या कार्यप्रणाली वर नागरिक रोष व्यकत करित आहे. तसेच कोरोना च्या भितीने रूग्णाना बाहे रच उभे ठेवण्यात येत असुन, व्यवस्थित औषधोपचार न होत असल्याने शहराती ल सहा सात महिलेची प्रसुती घरीच झा ल्याची माहीती आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ चौधरी यांच्या बेजबाबदार कार्यप्रणालीमुळे नेहमीच रुग्ण व कर्मचा ऱ्यांमध्ये खटके उडत आहे. या संपूर्ण प्रकरणात बेजबाबदार वागणूक देणा-या कर्मचा-यांवर कार्यवाही करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.