पूर्व नागपुरात आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे लोकार्पण
नागपूर. पूर्व नागपूरमध्ये ललीता पब्लीक स्कूल येथील कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रावर दिल्ली पब्लीक स्कूल(डीपीएस)ची विद्यार्थीनी भूमी हिने पहिली लस घेतली.
नगरसेवक तथा भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या पुढाकाराने प्रभाग २६ मधील शैलेश नगर येथील ललीता पब्लीक स्कूलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. लसीकरण केंद्राच्या लोकार्पणानंतर लसीकरणास प्रारंभ झाला. यावेळी १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींच्या लसीकरणामध्ये पहिली लस घेण्याचा मान भूमी ला मिळाला.
याप्रसंगी नगरसेविका चेतनाताई टांक, नगरसेविका मनीषा कोठे, नगरसेविका समिता चकोले, प्रमोद पेंडके, जे.पी.शर्मा, सुधीर दुबे, आशिष मरजीवे, अशोक सावरकर, सिंधू पराते, राजेश संगेवार, अशोक देशमुख, राजू गोतमारे, विनोद कुठे, रवी धांडे, नारायणसिंग गौर, संजय बेलसरे, प्रवीण आर्वीकर, डॉ.अनुश्री कामडे, तृप्ती बावने, अतुल वानखेडे, निलेश्वर तेलरांदे, राम सामंत आदी उपस्थित होते.