Published On : Wed, Jan 15th, 2020

भव्य कुस्तीचा आमदंगल केरडी ला थाटात संपन्न

Advertisement

मिरची पहेलवान, महिला कुस्ती सह पहेलवानांच्या कुस्त्या रंगल्या.

कन्हान : – जय बजरंग व्यायाम शाळा केरडी व्दारे ग्रामिण भागातील पहेलवा ना करिता आयोजित केरडी ला भव्य कुस्तीचा आमदंगल मध्ये मिरची पहेल वान, महिला कुस्ती सह पुरूष पहेलवा नांचे भरपुर कुस्ती सामने रंगल्याने उप स्थितांनी आमदंगल चा मनसोक्त लाभ घेतला.

दरवर्षी प्रमाणे मक्रर संक्रातीच्या शुभ पर्वावर पारशिवनी तालुक्यातील कन्हान जवळील केरडी गावात जय बजरंग व्यायाम शाळा केरडी व्दारे ग्रामिण परिसरातील लोकांच्या शरीर स्वास्थ, शरीर यष्टी मजबुत करून ग्रामि ण पहेलवानाच्या कलागुणाचा विकासा च्या दुष्टीने मंगळवार (दि.१४) ला दुपारी ३ वाजता भव्य कुस्तीचा आमदंगलचे नागपुर जिल्हा कुस्तीगीर संघ उपाध्यक्ष व जय बजरंग व्यायाम शाळा केरडीचे अध्यक्ष मा. दयाराम भोयर यांच्या अध्य क्षेत व प्रमुख अतिथी कामठी तालुका कुस्तीगर संघाचे अध्यक्ष धिरज यादव, कैलास खंडाळ, पाडुरंग काठोके, प्रविण शेलारे, शंकरराव फलके, क्रिष्णा हिवसे, कुस्तीचे पंच शिवाजी भोयर, सेवक गडे यांच्या हस्ते श्री हनुमान च्या प्रतिमेचे पुजन करून मिरची पहेलवान (छोटे मुले) यांच्या कुस्ती घेऊन आमदंगलची सुरूवात करण्यात आली.

मोठया मुलां च्या कुस्त्या नंतर महिला कुस्ती विद्या कोठेकर केरडी विरूध्द नेहा पहेलवान आमडी सामन्यात विद्या पहेलवान विज यी. सानिया शेंडे नागपुर विरूध्द दिपाली कोठेकर केरडी यात दिपाली विजयी झाल्याने तिला मान्यवरांच्या उपस्थित सायकल बक्षी देऊन गौरव केला. पुरूषां च्या कुस्ती मध्ये राकेश पहेलवान बनपुरी विरूध्द सतिश पहेलवान मानेगाव यात राकेश पहेलवान विजयी, प्रकाश पहेल वान केरडी विरूध्द क्रिष्णा जामगडे पहेलवान साटक यात क्रिष्णा जामगडे विजयी.

या कुस्त्या विशेष रंगल्या होत्या १५० च्या वर कुस्ती सामने घेण्यात आ ल्या असुन विजयी पहेलवांना जय बजरं ग व्यायाम शाळा केरडी व्दारे मान्यवरां च्या हस्ते बक्षी देण्यात आले. याप्रसंगी जि प सदस्य व्यकट कारेमोरे, देवाजी ठाकरे, देवाजी शेळकी, सुखराम लच्छोरे, टी सुर्यभगवान, रामभाऊ ठाकरे, संदीप यादव, कवडु बंड, आत्माराम उकुंडे, प्रशांत मसार, प्रेमदास तांडेकर आदी बहु संख्येने मान्यनर उपस्थित होते.

या आम दंगल मध्ये बरेच कुस्ती सामने चांगलेच रंगल्याने परिसरातील नागरिकांनी, पहेल वानानी मोठया संख्येने उपस्थित राहुन आमदंगल चा मनसोक्त लाभ घेतला. भव्य आमदंगल च्या यशस्वीते करिता देवाजी भोयर, राहुल वानखेडे,पुरूषोतम हिवसे, नानेश्वर भडंग, प्रकाश काठोके, सचिन फलके, गौरव भोयर, महेश वानखेडे, शुभम हिवसे, विक्की मानवट कर, निखील हिवसे, अकुंश कोठेकर, गणे़श हिवसे, मंगेश भोयर सहित समस्त गावक-यांनी परिश्रम घेतले.