Published On : Mon, Jul 6th, 2020

व्यापारी संघाच्या वतीने संपूर्ण दुकाने ठेवली बंद

Advertisement

– तीन दिवसीय जनता कर्फ्युला,संपूर्ण जनतेने दिला १०० टक्के प्रतिसाद

रामटेक– एक आठवड्यापूर्वी रामटेक तालुक्यात एकही रुग्ण नव्हता,परंतु याच आठवड्यात रामटेक तालुक्यातील नगरधन आणि हिवराबाजार येथे प्रत्येकी एक- एक रुग्ण आढळले. त्याच मागोमाग रामटेक शहरात देखील तीन रुग्णांचे अहवाल पोझिटीव्ह आले असल्याने रामटेक शहरासह तालुक्यात खडबड वाढली आहे.

रामटेक शहरात पूर्ण भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाचा प्रतिबंध करता यावा म्हणून व्यापारी संघाच्या वतीने तीन दिवस संपूर्ण दुकाने, भाजी मंडी, बंद राहणार आहेत. सर्वत्र रामटेक शहरात दिनांक ५ जुलै ते ७ जुलै पर्यंत जनता कर्द्यूचे आवाहन करण्यात आले आहे .जनता कर्फ्युला संपूर्ण जनतेने १०० टक्के प्रतिसाद दिला. यातून फक्त मेडिकल फार्मसी व दवाखाने सुरू आहेत.संपूर्ण जनतेने सहकार्य करावे.

असे आवाहन रामटेक व्यापार मंडळ ने केले आहे. पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी ,”रामटेक शहरात कोरोना रुग्ण सापडल्याने कोरोनाची साखळी तुटावी म्हणून जनता करफू तीन दिवस ठेवला आहे. नागरिकांनी स्वतःची पूर्ण काळजी घ्यावी तसेच मास्क ,सॅनिटायझरचा नियमितपणे वापर करावा.”आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.असे मत व्यक्त केले.