Published On : Fri, Jul 31st, 2020

महावितरणच्या जनजागृतीचा परिणाम; ७५ टक्के ग्राहकांनी वीज बिल भरले

Advertisement

विदर्भातील ३५ लाख ग्राहकांकडून दीड हजार कोटीच्या वीज बिलांचा भरणा,266 वेबिनार व 1 हजार 778 विशेष मदत कक्षाचा दीड लाख ग्राहकांना लाभ,2 टक्के सवलतिचा लाभ घ्यावा,ऑनलाईन वीज बिल भरावे : महावितरणचे आवाहन

नागपूर– ग्राहकांशी थेट संपर्क साधण्यासह वीज बिलाबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणने विविध पर्यायाद्वारे ग्राहकांमध्ये जनजागृती केली. 266 वेबिनार व 1 हजार 778 विशेष मदत कक्षाद्वारे दीड लाख ग्राहकांचे समाधान केले. तसेच 2 टक्के सवलतीसह बिल भरण्यासाठी हप्तेही पाडून देण्यात आले. त्यामुळे विदर्भातील घरगुती,वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील सुमारे ३५ लाख ग्राहकांनी 1 हजार 545 कोटी रुपयांचा वीज बिलांचा भरणा केला आहे . इतरही ग्राहकांनी कार्यालयात न येता वीज देयकाचा ऑन लाइन भरणा करावा व महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

Gold Rate
12 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,40,100/-
Gold 22 KT ₹ 1,30,300/-
Silver/Kg ₹ 2,55,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लॉक डाउनमुळे रिडींग न घेता आल्याने महावितरणने ग्राहकांना तीन महिन्यांचे एकत्रित वीज बिल दिले होते.त्यामुळे वीज बिल जास्त असल्याचा संशय ग्राहकांच्या मनात निर्माण झाला होता.तो दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहकांशी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनी द्वारे संपर्क,ग्राहक मेळावे,वेबिनार,विशेष मदत कक्ष,लोकप्रतिनिधी व परिसरातील ग्राहकांसाठी माहिती देण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप या शिवाय ग्राहकांच्या मोबाईलवर एस.एम.एस व बिल तपासण्यासाठी वेब लिंक आणि वीज बिलवर बिलाची संपूर्ण माहिती इत्यादी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या.नागपूर प्रादेशिक कार्यालया अंतर्गत एकूण 266 वेबिनार व 1हजार 778 विशेष मदत कक्ष उभारण्यात आले.त्याचा लाभ सुमारे 1 लाख 75 हजार ग्राहकांनी घेतला. या सर्व उपाययोजनांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद देत मोठ्या संख्येत वीज बिलांचा भरणा केला आहे.

लॉक डाउन सुरु झाल्यानंतर १ 2020 एप्रिल ते २८ जुलै २०२० या दरम्यान विदर्भातील सुमारे ३५ लाख ३९ हजार २०० ग्राहकांनी १ हजार ५४५ कोटी रुपयांचे वीज बिल भरले. ग्राहकांची वर्गवारी आणि त्यांनी भरलेले रुपये पुढील प्रमाणे: घरगुती -३१ लाख ९४ हजार ५१०- रुपये ६५६ कोटी, वाणिज्यिक -२ लाख ३३ हजार ६४० – रुपये १४१ कोटी,औद्योगिक -६७ हजार ४००- रूपये ६११ कोटी व इतर ४० हजार – रुपये १३४ कोटी रुपये यांचा समावेश आहे. यात जून आणि जुलै या दोन महिन्यातील वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण सुमारे १३ लाख असून या ग्राहकांनी सुमारे ७०८ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे.

1 एप्रिल 2020 ते 28 जुलै या काळात नागपूर प्रादेशिक कार्यालया अंतर्गत येणाऱ्या नागपूर परिमंडलात सर्वाधिक सुमारे 15 लाख 6 हजार 520 ग्राहकांनी रूपये 869 कोटी ,चंद्रपूर परिमंडलात 5लाख 61 हजार 750 ग्राहकांनी रूपये 219 कोटी,अमरावती परिमंडलात 5 लाख 86 हजार 410 ग्राहकांनी रूपये 197 कोटी ,गोंदिया- 4 लाख 11 हजार 340 ग्राहकांनी रुपये 115 कोटी आणि अकोला परिमंडलातील सुमारे 4 लाख 73 हजार 200 ग्राहकांनी रुपये 143 कोटी एवढा वीज बिलांचा भरणा केला आहे.

ग्राहकांना थकबाकीतील संपूर्ण रकमेचा भरणा केल्यास त्या रकमेवर 2 टक्के सवलत मिळणार असून तीन हप्त्यात वीज बिल भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे. ही सवलत घेणाऱ्या वीज ग्राहकाला व्याज, विलंब शुल्क, दंड आकारल्या जाणार नाही. याचा लाभ घेण्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयात गर्दी न करता ऑनलाईनद्वारे वीज बिल भरावे व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement