Published On : Fri, Jul 31st, 2020

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आशा वर्कर्साचां सत्कार

Advertisement

नागपुर – हिंगणा तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे कंटोनमेंट भागात योग्य कामगिरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. हिंगणा तालुक्यातील रायपुर आरोग्य केंद्रात आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय.टी.यू) नागपूर चे अध्यक्ष राजेंद्र साठे यांच्या अध्यक्षतेत आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती अध्यक्ष-सरपंच- नलिनी सेरकुरे, नीलिमा कोंबाडे, बी सी एम- प्रीती लांजेवार, युनियन महासचिव प्रीती मेश्राम, गटप्रवर्तक संगीता राऊत, किरण सोरते, पूजा येसकर, संगीता पांडे, अरुणा शेंडे, मंदा जाधव यांच्या उपस्थितीत आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्षांच्या भाषणात राजेंद्र साठे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्या करीता नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या कार्यावर माहिती देऊन प्रकाश टाकला. स्वतःची काळजी न करता कोरोना मुक्ती करीता आशा वर्कर्स अल्प मोबदल्यात जमिनी स्तरावर करीत असलेल्या समाज कार्याची प्रशंसा केली.

अशा योग्य कामगिरी करणाऱ्या आशांना सरकारी कर्मचारीचा दर्जा देऊन किमान २१ हजार रुपये पगार द्यावा अशी मागणी केली. त्याकरीता आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांनी संयुक्तरित्या मोठा संघर्ष करण्याची गरज आहे असे आपल्या संबोधनात सांगितले. नलिनी सेरकूरे यांनी देशातून अंधश्रध्दा हद्दपार केल्या नंतरचे महत्त्व पटवून सांगितले.