Published On : Fri, Nov 3rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

मध्यमवर्गीयांसाठी घराचे स्वप्न होणार पूर्ण ; मोदी सरकार नवीन योजना आणण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर, शहरी भागातील मध्यमवर्गीयांसाठी आनंदची बातमी घेऊन आले आहेत. सर्वसामान्य जनतेला आता स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

हाऊसिंग स्कीमअंतर्गत लोनवरील व्याजावर मोठी सूट मिळू शकते. या योजनेंतर्गत 9 लाख रुपयांपर्यंतच्या लोनवर 3-6.5% दरम्यान वार्षिक व्याज सब्सिडी दिली जाऊ शकते. याच बरोबर, 20 वर्षांच्या कार्यकाळासाठी 50 लाख रुपयांपेक्षा कमीचे होम लोन या योजनेच्या कक्षेत येईल. ही योजना पुढील 5 वर्षांसाठी असेल आणि सरकार या योजनेवर सुमारे 7.2 अब्ज डॉलर एवढा खर्च करेल. काही दिवसांपूर्वी, या योजनेसंदर्भात सरकारी अधिकारी आणि बँकांचे प्रतिनिधिय यांची बैठकही झाली आहे.

Gold Rate
May 05- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,48,800 /-
Gold 22 KT ₹ 1,38,400 /-
Silver/Kg ₹ 2,47,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान आगामी 2024 मध्ये लोकसभेसाठी निवडणुका होणार आहेत. या दृष्टीनेही सरकारची ही नवी योजना महत्त्वाची मानली जात असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement