Published On : Sat, Sep 29th, 2018

महावितरणची नाट्य रसिकांना मेजवानी आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा 3 ऑक्टोंबरपासून

Mahavitaran Logo Marathi

नागपूर : महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे बुधवार दि. 3 ऑक्टोबर 2018 पासून करण्यात येत आहे. या स्पर्धेत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या पाचही परिमंडलांतर्फ़े नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.

या स्पर्धेचा शुभारंभ बुधवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभुत आराखडा) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते करण्यात येईल, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत हे राहतील, याप्रसंगी अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर आणि गोंदीया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरेकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या स्पर्धेत बुधवार दि. 3 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9 वाजता चंद्रपूर परिमंडलातर्फ़े अशोक बुरबुरे लिखित ‘आग्टं’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल, दुपारी 2 वाजता हेमंत ऎदलाबादकर यांनी लिहीलेले ‘ती रात्र’ हा नाट्यप्रयोग अमरावती परिमंडलातर्फ़े सादर करण्यात येईल, तर सायंकाळी 6.30 वाजता प्रशांत दळवी लिखित ‘चारचौघी’ हा नाट्यप्रयोग गोंदीया परिमंडलातर्फ़े सादर करण्यात येईल. गुरुवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता अकोला परिमंडलातर्फ़े चंद्रकांत शिंदे लिखित ‘बाबा मी तुमचीच मुलगी आहे’ हा नाट्यप्रयोग तर दुपारी 1.30 वाजता दिपेश सावंत यांनी लिहिलेले ‘ओय लेले’ चा नाट्यप्रयोग नागपूर परिमंडलातर्फ़े सादर केला जाईल.

या नाट्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेत होणा-या या कार्यक्रमाला कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे आणि प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांची प्रमुख उपस्थिती राहील. या स्पर्धेत सादर करण्यात येणारे सर्व प्रयोग विनामुल्य आहेत. नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने या प्रयोगांना उपस्थित राहून महावितरणच्या कलावंतांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन नाट्यस्पर्धेचे स्वागताध्यक्ष तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement