Published On : Tue, Apr 3rd, 2018

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅब वाटप

Advertisement

मुंबई : अन्न औषध विभागाचे कामकाज पेपरलेस करून कामकाजाला गती देण्यात येत आहे. जनतेची कामे तत्परतेने करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संगणक प्रणाली विकसित करुन ती कार्यान्व‍ित करण्यात आली आहे. ही प्रणाली असलेल्या टॅबचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

ऑनलाईन नोंदणी क्रमांक, परवाने क्रमांक आदी देण्यासाठी या टॅबचा वापर केला जाणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे विविध कायदे राबवणे, आस्थापनांच्या तपासण्या, उपलब्ध मनुष्यबळ तसेच कायद्याचे उल्लंघन इत्यादींच्या लेखाजोख्यासाठी हे टॅब उपयुक्त ठरणार आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला. अन्न सुरक्षा अधिकारी, औषध निरीक्षक, कार्य क्षेत्रीय अधिकारी आदींचे कामकाज यामुळे सुलभ होणार आहे. राज्यातील 428 अधिकाऱ्यांना हे टॅब देण्यात येणार असून यासाठी सुमारे 48 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. एका टॅबची किंमत 9 हजार 416 रुपये एवढी आहे.