Published On : Tue, Jan 22nd, 2019

मिहान मधील कंपन्यांची मेट्रो कडे फिडर सर्विस ची मागणी

मिहान मधील कर्मचारी मेट्रोच्या वाटेवर

Nagpur Metro, Majhi Metro

नागपूर : महा मेट्रो नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाद्वारे प्रवासी वाहतूक सेवा सुरु करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर मेट्रो तर्फे #धावणार माझी मेट्रो कॅम्पेन अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे, याच अनुषंगाने मिहान येथील सेंट्रल फॅसिलिटी इमारत(डब्ल्यू. बिल्डिंग) येथे स्थानिक आयटी कंपनी करिता मेट्रो संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात मेट्रो अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

सदर कार्यक्रमात मिहानमधील जास्तीत जास्ती आयटी कंपन्याना मेट्रो रेल आणि मेट्रोच्या प्रवासी सेवेशी जोडण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. सध्यास्थितीत मिहान मध्ये कार्यरत कर्मचारी स्वतःच्या टू-व्हीलर, चारचाकी,कंपनी बसेस चा उपयोग करून ये-जा करीत आहे. महा मेट्रोचा प्रयत्न आहे की कार्यरत कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्ती मेट्रो सेवेचा उपयोग करून रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करावी शिवाय मेट्रो रेलच्या फायद्यापासून देखील त्यांना अवगत केले.


उपस्थित कर्मचाऱ्यांना महा मेट्रोचे अतिरिक्त व्यवस्थापक श्री. महेश गुप्ता यांनी मेट्रो स्टेशन ते मिहान मधील कंपन्या पर्यंत थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने बस सेवा देखील सुरु करण्यात येण्याचे सांगितले तसेच मेट्रो सेवेचा उपयोग केल्यास दैनंदिन उर्जा,पैसा आणि वेळेची बचत होईल असेही आवर्जून त्यांना सांगण्यात आले.

धावणार माझी मेट्रो कार्यक्रमा अंतर्गत उपस्थित कंपनी प्रतिनिधी,कर्मचारी यांनी चांगला प्रतिसाद दिला असून मेट्रो अधिकाऱ्यांसमोर काही प्रस्ताव मांडले. या प्रस्तावामध्ये त्यांनी मेट्रो स्टेशन ते कंपनी पर्यंत ये-जा करणाऱ्या फिडर सर्विस सोबतच मेट्रो रेलची फ्रीक्वेन्सी वाढवण्यात यावी अशी मागणी केली त्यासोबतच या योजेनेमुळे शहरातील, जास्तीत जास्त भाग मेट्रो फिडर सर्विसच्या माध्यमातून एकमेंकांशी जोडण्यात यावे अशी मागणी या कार्यक्रमात उपस्थित कर्मचाऱ्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केली व महा मेट्रोच्या ‘विश वॉलवर आपल्या शुभेच्छा देत मेट्रो सेवा लवकरात लवकर सुरु करण्यात यावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

यावेळी एमएडीसी चे जनसंपर्क अधिकारी श्री. दीपक जोशी,ग्लोबल लॉजिक कंपनीचे श्री.संजय गावंडे, ईबीक्स कंपनी कु. तृष्णा पांडे, स्टेट बँक इंडिया,इंफोसेप्टस,एम.आर.आर.सॉफ्ट, ईबीव्कस, व्लाऊड डेटा, वेबजिया सोल्युशनस चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.