Published On : Mon, Jun 17th, 2019

विद्दूत धक्क्याने घोरपड च्या वृद्ध महिलेचा मृत्यू

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या चिकना-बोरगाव ग्रामपंचायत उपसरपंच अनिल मानवटकर यांचा शेतातील विद्दूत डी पी ला करंट लागून मृत्यू झाल्याच्या घटनेला एक दिवस लोटत नाही तोच आज घोरपड गावातील एका वृद्ध महिलेचा तिच्या राहत्या घरातच विद्दूत धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारो 3 दरम्यान घडली असून मृतक वृद्ध महिलेचे नाव लिलाबाई हेमराज मेश्राम वय अंदाजे 55 वर्षे रा. घोरपड कामठी असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर वृद्ध महिला घरकामात व्यस्त असताना घरातील विद्दूत बोर्ड वर इलेक्ट्रिक प्लग लावत असता अचानक जोरदार करंट लागल्याने खाली पडून बेशुद्ध पडल्या ही माहिती कामाला गेलेल्या मुलाला व पतीला माहिती मिळताच मुलगा व पतीने त्वरित मदतीची धाव घेत कामठी येथील शासकिय उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले

Advertisement

यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीतून जख्मि वृद्ध महिलेस मृत घोषित केले.यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतक महिलेच्या पाठीमागे पती , तीन मुले , सून व नातवंड असा आप्तपरिवार आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement