Published On : Fri, Oct 12th, 2018

विधृत मंडळाच्या चुकीने विधृत शॉक लागुन गरोदर म्हशीचा मुत्यु

कन्हान : – वराडा रोड वरील नविन विधृत लाईन च्या गार्डीगला लागुनच असलेल्या विधृत ताराचा चिपकुन गार्डींग तारा खाली जमिनीवर पडल्या असल्याने चराई करून म्हशी घराकडे जात असताना एका गरोदर म्हशीच्या पायाला विधृत ताराचा स्पर्साने शॉक लागुन गरोदर म्हशीचा घटनास्थळीच मुत्यु झाला .

शुक्रवार ( दि १२) दुपारी ३.३० वाजता दरम्यान वराडा येथील शेतकरी रविंद्र बाळकृष्ण पुंड वय ५१ वर्ष याच्या चार म्हशी सुखदेवे बर्वे हा चराई करून वराडा रोडने घराकडे परत जात असताना बंद फिटकरी कम्पनी जवळील डी पी च्या सामोर नव्याने टाकण्यात आलेल्या विधृत लाईन च्या गार्डींग ताराला लागुनच असलेल्या विधृत खांबाच्या जिवंत ताराला गार्डीगच्या तारा चिपकुन डबल फेस होऊन गार्डींगच्या तारा जमिनीवर खाली पडल्या होत्या या तारात विधृत प्रवाह असल्याने एका गरोदर म्हशीच्या पायाला विधृत ताराचा स्पर्साने शॉक लागुन गरोदर म्हशीचा घटनास्थळीच मुत्यु झाला .

घटनेची माहीती नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे यांना दिली असता पटवारी , इंजिनिअर गवते , पशु वैद्यकीय अधिकारी वाळके , कुंभरे पोहचुन पंचनामा केला .

रविंद्र पुंड यांची गरोदर ६ वर्षाची म्हश विधृत मंडळाच्या लापरवाही मुळे शॉक लागुन मुत्यु झाल्याने शेतकऱ्याचे १ लाख ४० हजार रूपयांचे नुकसान झाल्याने विधृत मंडळाने त्वरीत नुकसान भरपाई दयावी अशी मागणी माजी सभापती देविदास जामदार, माजी उपसभापती देवाजी शेळकी सह गावक-यांनी केली आहे .