Advertisement
मुंबई : राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली होती.
डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे आज त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.
आज ते ठाण्यातील निवासस्थानीच आराम करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महायुतीत सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे.
दिल्लीतील बैठकीनंतर आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार होती.परंतु आज एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द केल्याने महायुतीची बैठक देखील आता लांबणीवर गेली आहे.