Published On : Mon, Dec 3rd, 2018

वेकोलि नाल्यालत अशोक नगरात भुषणचा सडक्या अवस्थेत मृतदेह

कन्हान : – कन्हान येथील अशोक नगर जवळील वेकोलि कोळशा खदान च्या नाल्याजवळ सडक्यावस्थेत मृत्युदेह मिळल्याने खळबळ उडाली असून भूषण प्रल्हाद मनघटे मृतकाची ओळख पटली आहे .

सोमवार (दि.३) ला सकाळी ११.३० वाजता दरम्यान अशोक नगर कन्हान ला लागुनच असलेल्या वेकोलि कामठी खुली कोळशा खदानच्या नाल्याकडील झाडीतुन भयानक दुगधी येत असल्याचे कचरा फेकाला गेलेल्या एका महिलेने मौहल्यात सांगितले असता स्थानिक लोकांनी त्याठिकाणी जावून पाहिले असता मृत्युदेह छिन्नवस्थेत आढळला असून डुकर किंवा कुत्र्यानी त्याचे लचके तोडले असावे अशी शंका व्यक्त केली गेली. आंगावरिल कपडयावरुन जवळच राहत असणाऱ्या भूषण प्रल्हाद मनघटे वय २४ वर्ष रा अशोक नगर चा मृत्युदेह असल्याची ओळख पटली .

Gold Rate
26 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,400 /-
Gold 22 KT ₹ 1,06,400 /-
Silver/Kg ₹ 1,38,100/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही घरच्याना माहिती मिळताच कुटुबियानी घटनास्थळ गाठले. कुटुंबियानुसार मृतक भूषण गुरुवार ४ दिवसांपासून बेपत्ता होता. कन्हान पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचुन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला . असून अद्याप मृत्युचे कारण स्पष्ट झाले नाही. तो शौचाकरिता गेला असावा व नाल्यालागत विषारी जीवजंतुने त्याचा मुत्यु झाला असावा अशी खंत लोक चर्चेतुन व्यकत करित होते.

वेकोलि कामठी खुली कोळशा खदान च्या नाल्याच्या लगत अशोक नगर व सुरेश नगर च्या मधात मोठ मैदान असुन येथे मोठय़ा प्रमाणात झाडी झुडपे वाढलेली असल्याने या परिसरात जवळील नागरिक शौचालयास जात असतात भंयकर झाडी झुडपी व नाला असल्याने विषारी जिवजंतु सुध्दा असतात यामुळे ही झाडी झुडपाची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी निवेदन देऊन नगरपरिषद प्रशासन कडे केली होती . यावर अमल करण्यात आले असते तर असला प्रकार कदाचित घडला नसता अशी खंत स्थानिय मनिष भिवगडे व नागरिकांनी व्यकत केली .

चार दिवसा नंतर मृत्यूदेह घरा पासून १०० मिटर अंतरावर अचानक मिळल्याने भुषणचा आकस्मिक मुत्यु की हत्या ? अश्या उलटसुलट चर्चेला नागरिकांत उधाण आलेले होते .

Advertisement
Advertisement