Published On : Mon, May 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या लाखनी येथील वाहनचोर टोळीचा क्राइम ब्रांचकडून पर्दाफाश,१४ दुचाकी जप्त!

- १३.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Advertisement

नागपूर– शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त असतानाच नागपूर क्राइम ब्रांचच्या युनिट-१ ने मोठी कारवाई करत लाखनी, भंडारा येथील वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवलेल्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी १४ चोरीच्या दुचाकींसह तब्बल १३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विश्वासार्ह माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने लाखनी येथे सापळा रचत आरोपी पियुष रविंद्र जगनाडे याला विनानंबर प्लेटच्या अॅक्टिव्हासह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार अंशुल सरजारे आणि दीप रामटेके यांची नावे उघड केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक करत सखोल चौकशी केली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तपासादरम्यान आरोपींकडून ३ रॉयल एनफिल्ड बुलेट, ८ होंडा अॅक्टिव्हा, पल्सर 220, होंडा युनिकॉर्न आणि होंडा फॅशन प्रो अशा एकूण १४ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच दोन मोबाईल फोनही हस्तगत करण्यात आले.

ही वाहने नागपूर शहरातील बजाजनगर, एमआयडीसी, प्रतापनगर, हुडकेश्वर, सोनेगाव, खापरखेडा आणि बोरी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल वाहन चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Advertisement

संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी आणि डीसीपी डिटेक्शन राहुल माखणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

गुन्हे शाखा युनिट-१ च्या या धडक कारवाईमुळे वाहनचोरांच्या टोळीला मोठा धक्का बसला असून, नागपूरकरांमध्ये पोलिसांबद्दल पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges