Published On : Thu, Jun 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

देशाची शिक्षण व्यवस्था आयसीयूमध्ये;नागपुरातून काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांचा केंद्रावर हल्लाबोल

Advertisement

नागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रव्यापी ‘छात्रों की गुंज’ अभियानांतर्गत नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर तीव्र टीका करण्यात आली. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी देशातील शिक्षण व्यवस्था गंभीर संकटात असल्याचा दावा करत, “देशाची शिक्षण व्यवस्था आज आयसीयूमध्ये पोहोचली आहे, त्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे,” असा आरोप केला. नागपूरच्या प्रेस क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे पेपर फुटणे ही केवळ प्रशासकीय चूक नसून शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

देशभरातील विद्यार्थी पेपर लीक, नोकरभरतीतील विलंब, वाढती बेरोजगारी, महागडे कोचिंग क्लासेस आणि दर्जेदार शिक्षणाच्या अभावामुळे त्रस्त आहेत. मात्र सरकार या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला. शिक्षण क्षेत्रात माफियांचे जाळे वाढत असून त्यावर सरकारचे नियंत्रण नसल्याचेही त्यांनी म्हटले.

‘छात्रों की गुंज’ हे अभियान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर आवाज देण्यासाठी सुरू करण्यात आले असून शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी या माध्यमातून केली जात आहे.

Advertisement

या पत्रकार परिषदेला नागपूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील उपस्थित होते.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges