Published On : Fri, Oct 9th, 2020

आंबेडकरी चळवळीचा खंदा नेता देशाने गमावला- जयदीप कवाडे

Advertisement

– पीरिपातर्फे रामविलास पासवान यांना आदरांजली

नागपूर. बिहारच्या राजकारणात 49 वर्षांपासून स्व:तची दलित व समाजवादी जननेता म्हणून देशात एक वेगळी प्रतिमा केंद्रीयमंत्री आणि लोकजनशक्ति पार्टी व दलित सेनेचे संस्थापक रामविलास पासवान यांची होती. पासवान यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचा खंदा नेता देशाने गमावला, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केले. सीताबर्डी आनंद नगरातील पक्षाच्या कार्यालयात दिवंगत पासवान यांच्या आदरांजली सभेत ते बोलत होते. यावेळी कवाडेंच्या हस्ते पासवान यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून आदरांजली वाहन्यात आली.

Gold Rate
28 April 2025
Gold 24 KT 95,700 /-
Gold 22 KT 89,000 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना कवाडे म्हणाले की, वयाच्या 74 व्या वर्षी पासवान यांच्या निधनाने बहुजन चळवळीची अपरिमीत हानी झाली आहे. मंडल आयोगापासून ते अनेक दलित चळवळीचा चेहरा असलेले पासवान यांचे महाराष्ट्राशी अतुट नाते होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनापासून अनेक चळवळींना त्यांनी सक्रीय पाठिंबा दिला. अनेकदा प्रत्यक्ष आंदोलनात भाग घेण्यासाठी ते महाराष्ट्रात यायचे. हाजीपूर लोकसभा क्षेत्रातून 8 वेळा निवडून येणारे पासवान आपल्या अटी वर आणि लोकांच्या हितासाठी झटणारा एक लढवय्ये नेते होते.

त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राममनोहर लोहिया यांचा वैचारिक वारसा लाभलेले त्यांचे नेतृत्व संघर्षमय होते असेही कवाडे यावेळी म्हणाले. याप्रसंगी नागपूर शहराध्यक्ष अरुण गजभिये, नागपूर जिल्हा संघटक अजय चव्हाण, प्रदेश संघटक कपिल लिंगायत, नागपूर शहर महामंत्री प्रकाश मेश्राम, विपीन गाडगीलवार, स्वप्नील महल्ले, महिंद्र पावडे, निरज पराडकर, उत्तम हुमणे, भीमराव कळमकर, यशवंत धडाडे, पंकज भोतमांगे, मिलिंद साखरकर, मनोज सोंकुसरे, प्रजोत कांबळे, पीयूष हलमारे, भगवान भोजवणी, कैलास बोंबले आदींची उपस्थिती होती.

-नामांतर आंदोलनात महत्त्वाचे योगदान
मंडल आयोग व नामांतर आंदोलनामध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. सद्या ते राज्यसभा सदस्य होते. भारतीय संसदेच्या इतिहासमध्ये लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून चाळीस वर्षांचे योगदान देणारे ते लोकप्रिय नेते होते. वयाच्या 25 व्या वर्षी पहिल्यांदा बिहारच्या विधान सभेमध्ये संयुक्त समाजवादी सदस्य म्हणून 1969 मध्ये निवडूण गेले. 1975 साली आणिबाणीचा विरोध करून 19 वर्ष तुरुंगामध्ये राहिल्यानंतर 1977 मध्ये हाजीपूर लोकसभा निवडणूक लढवून पाच लाखांनी विजय पासवान यांनी मिळविले. आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण आंबेडकरी चळवळीची हानी झाली आहे, अशा शब्दांत कार्याध्यक्ष कवाडे यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.

Advertisement
Advertisement