Published On : Tue, Mar 24th, 2020

कोरोनासाठी प्रशासन सज्ज, देखरेखीसाठी तालुका समिती गठीत

Advertisement

कामठी :-जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून महाराष्ट्रातही मोठ्या प्रमानात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ माजली असून कामठी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठो प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी च्या आदेशनव्ये तालुका समिती गठीत करण्यात आली या तालुका समितीच्या अध्यक्षस्थानी एसडीओ श्याम मदनूरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून एसडीओ श्याम मदनूरकर यांनी आज कामठी तहसिल कार्यालयात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याच्या नावाखाली संबंधित अधिकाऱ्यांची प्रशासकीय बैठक घेण्यात आली या बैठकीत कोरोना व्हायरस संदर्भात प्रशासकीय अंमलबाजावणीसह प्रशासकीय दिशा निर्देश दिले.

याप्रसंगी तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार रणजित दुसावार, बीडीओ सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी रमाकांत डाके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ धीरज चोखानद्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनी, विद्दत विभागाचे उपकार्यकारी अभियंता दिलीप मदने, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी कश्यप सावरकर, पोलीस वि भागाचे महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल चामले आदी उपस्थित होते.

Gold Rate
08 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 1,08,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कामठी तालुक्यात जनता कॅर्फु सह जमावबंदी कायदा लागू असला तरी नागरिक अनावश्यक बाहेर पडून प्रशासनाला सहकार्य करीत नसल्याचे गांभीर्य लक्षात घेत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आले आहे तेव्हा नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे,.तालुक्यातील नागरिकांनी विनाकारण प्रवास करू नये, तर कदाचित कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव तालुक्यात वाढल्यास आरोग्य विभागाकडे असलेल्या उपाययोजना चा आढावा घेण्यात आला त्यात आकस्मित सेवा, आयझोलेशन वॉर्ड आदींचा आढावा घेण्यात आला याप्रसंगी वेळप्रसंगी प्रशासन सज्ज असून नागरिकाच्या सोयीसाठी प्रशासन कुठेही कमजोर पडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन एसडीओ श्याम मदनूरकर यांनी उपस्थित प्रशासनिक अधिकाऱ्यांना दिले.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement