Published On : Mon, May 3rd, 2021

कुंभारे कॉलोनित पिण्याच्या पाण्याच्या ठणठणाट

Advertisement

– वर्ष लोटूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेना

कामठी – स्थानिक नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र 16 येथील कुंभारे कॉलोनी, सम्राट नगर,छत्रपती नगर आदी भाग हे दलित वस्तीत समावेशक असून दलित वस्त्यांचा विकास व्हावा या मुख्य उद्देशाने शासनाकडून दरवर्षी नगर परिषद ला करोडो रुपयाचा निधी प्राप्त होत असतो मात्र येथील नगर परिषद प्रशासनाच्या कामचुकार कार्यप्रणालीमुळे या दलित वस्त्यांचा विकास न झाल्याने बकास झाल्या आहेत तर बिडी कामगारांची वसाहत म्हणून प्रसिद्धीस असलेल्या कुंभारे कॉलोनीत अजूनही पाण्याचा ठणठणाट आहे.तर या परिसरातील काहो भागात मागील कित्येक वर्षा पासून नळाला पाणी येत नसल्याने या नागरिकांचो ‘घरी नळ तरी पाण्याचा रड’अशी अवस्था आहे .

यासंदर्भांत केलेल्या तक्रारीवरून थातुरमातुर पाईपलाईनची दुरुसती करण्यात आली होती मात्र तरीही पाण्याची व्यवस्था झाली नाही तर आजच्या स्थितीत कोरोनाचा प्रकोप दुसरीकडे पाण्याची दुरावस्था यासंदर्भात परिसरातील जागरूक नागरिक विशाल चहांदे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार उके यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

पूर्वी कामठी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषद ला महानगर पालिकेकडून पाणी विकत घ्यावे लागत होते त्यातही फक्त 3.6दशलक्ष लिटर्सप्रतिदिन इतकेच पाणी मिळत होते त्यामुळे कामठी शहरात पाण्याची भीषण टंचाई होती यावर मात करण्यासाठी शहरात स्वतंत्र पाणी पुरवठा ची सोय व्हावी यासाठी माजी राज्यमंत्री एड सुलेखाताई कुंभारे यांनी आंदोलने केली व या संघर्षशील नेतृत्वाने कामठी शहरासाठी स्वतंत्र प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवीत 28.25कोटीच्या निधीतून 16 एप्रिल 1998 ला तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे,तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.नितीन गडकरी , माजी राज्यमंत्री एड सुलेखाताई कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले होते.तर 19 डिसेंबर 2001 ला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख , तत्कालीन विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या शुभ हस्ते या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले यानुसार शहरव्यतिरिक्त आजनी, गादा,घोरपड, रनाळा व येरखेडा ह्या पाच गावाला ही पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली होती तर संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूर नंतर विदर्भातील एकमेव कामठी येथे 11 हेक्टर जागेत 750 घरकुलांची बिडी कामगारांसाठी घरकुल योजना यशस्वी करीत सुलेखाताईच्या अथक प्रयत्नातून कुंभारे कॉलोनी नामक बिडी वसाहत वसविण्यात आली मात्र ज्या राज्यमंत्रीच्या अथक प्रयनातून शहरात स्वतंत्र पाणी पुरवठा ची सोय करीत शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यात आला त्याच सुलेखाताईच्या अथक प्रयत्नातून वसलेल्या बिडी कामगारांच्या वसाहत कुंभारे कॉलॉनीत अजूनही पाण्याचा ठणठणाट असून मागील एक वर्षपासून कुंभारे कोलोणीच्या काही भागात पाण्यासाठी वणवण भटकंती करावे लागते ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल…