Published On : Mon, May 3rd, 2021

मृतक फ्रंट लाईन हेल्थ वर्करला प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्या

– नगरसेविका संध्याताई रायबोले यांची मागणी


कामठी – येथील प्रभाग १५ चे नगर परिषद चे स्वच्छता कर्मचारी विजय गणेश बरोंडे आणि गौतम नगर छावणी येथील सौ विणाताई धम्मरत्न तांबे, तिरंगा चौक रामगढ येथील लक्ष्मीताई रामकृष्ण ऊके या दोन अंगणवाडी सेविकाचा कोरोना प्रार्दुभावाने खासगी इस्पितळात उपचारा दरम्यान अकाली मृत्यू झाला असून या तीनही फ्रंट लाईन हेल्थ वर्कर ला शासन नियमानुसार प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी प्रभाग 15 च्या नगरसेविका संध्याताई रायबोले यांनी मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे साहेब यांना निवेदना द्वारे केली आहे

कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा टेकचंदजी सावरकर साहेब यांना याबाबत निवेदन देऊन सरकार दरबारी पाठपुरावा करण्याची विनंती नगरसेविका संध्याताई रायबोले यांनी केली

केंद्रीय मंत्री मा नितिनजी गडकरी साहेब,खासदार मा कृपालजी तुमाने साहेब व इतर संबधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना देखील निवेदन सादर करण्यात आले


फ्रन्टलाइन हेल्थ वर्करला फेस मास्क, सॅनिटायझर,हँड ग्लोब्ज,फेस शिल्ड न देता सरळ कोरोना सर्वे वर पाठवण्यात येत आहे कोरोना पोजिटीव्ह रुग्णांच्या थेट सपंर्कात येत असल्याने फ्रंटलाईन वर काम करणाऱ्या सफाई कर्मचारी,शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा ताई यांचे जीवन धोक्यात आले आहे, स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांना कोरोनाचा सर्वे करावा लागत आहे,

आ सावरकर साहेब यांना निवेदन देतांना भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले, न प कामठी चे विरोधी पक्षनेते लालसिंग यादव, भाजपा नगरसेवक प्रतिक पडोळे प्रामुख्याने उपस्थित होते