Published On : Fri, Jan 31st, 2020

नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यास आयुक्त आले कक्षाबाहेर

Advertisement

दुस-या दिवशी ६४ तक्रारींवर सुनावणी

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जनता दरबाराला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकदा तक्रारी करूनही कार्यवाही होत नसताना आयुक्त स्वत: तक्रारींची दखल घेत असल्याची माहिती शहरात पसरताच दुस-या दिवशी गुरूवारी (ता.३०) मनपा आयुक्त कक्षापुढे नागरिकांनी तोबा गर्दी केली. वेळेअभावी सुनावणी न होउ शकणा-या तक्रारी स्वीकारण्यासाठी मनपा आयुक्त स्वत: कक्षाबाहेर आले आणि त्यांनी तक्रार अर्ज स्वीकारले.

Gold Rate
15 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900 /-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 1,92,100/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागरिकांच्या तक्रारींसाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ५ हा वेळ निर्धारित केला. मात्र गुरूवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त कक्षापुढे नागरिकांची गर्दी पाहता आयुक्तांना सायंकाळी ६ वाजतापर्यंत वेळ वाढवावा लागला. वेळ वाढवूनही काही तक्रारींवर सुनावणी होउ शकली नाही.

आयुक्तांच्या कक्षाबाहेर नागरिक तक्रारींसह उभे असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त तुकाराम मुंढे स्वत: कक्षाबाहेर आले व त्यांनी सर्व उर्वरित तक्रारअर्ज स्वीकारले. सुनावणी न झालेल्या प्रत्येक तक्रारींची दखल घेउन त्याचे निराकरण करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. गुरूवारी (ता.३०) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एकूण ६४ तक्रारी ऐकून घेतल्या.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement