Published On : Fri, Jun 15th, 2018

राजस्व शिबीराचा नागरिकांनी लाभ घेतला .

Advertisement

कन्हान : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणा साठी जुन महिन्यात हातातील कामे बाजुला करून विविध दाखल्यांसाठी धावपळ करावी लागते . तेव्हा त्यांना गावातच ही सेवा मिळवुन देण्याच्या उद्देशाने नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कन्हान-पिपरी परिसरात आयोजित राजस्व शिबीराचा कन्हान परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी भरपूर लाभ घेतला .

उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परिक्षेचा नुकतेच निकाल जाहीर झाले आहे. जुन महिन्या म्हणजे शेतकऱ्यांचा कामाचा तसेच पेरणीसाठी जुळवाजुळव करण्याकरिता अत्यंत धावपळीचे दिवस आहेत . परंतु विद्यार्थ्यांच्या दाखल्या साठी शेतकरी व कामगार, पालकांना शेतीचे व आपले कामे बाजुला सारून इकडुन तिकडे धावाधाव करावी लागते . कधी कर्मचारी तर कधी अधिकारी हजर न मिळाल्यामुळे वेळ वाया घालवावा लागतो. अनेकदा निराश होऊनच परत यावे लागते . अशावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय होऊ नये व त्यांना गावातच विविध दाखले मिळावे , या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशान्वये उपविभागीय अधिकारी रामटेक यांनी विभागीय स्तरावर राजस्व शिबीराचे आयोजन केले.

पारशिवनी तालुक्यातील नगरपरिषद कन्हान-पिपरी परिसरात बुधवार दि. १३ जुन २०१८ ला सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत राजस्व शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरात तहसिलदार वरूण सहारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसिलदार प्रेम कुमार आडे यांच्या नेतृत्वाखाली जातीचे प्रमाणपत्र – १०५ , उत्पन्नाचे दाखले – १३९ , अधिवास प्रमाणपत्र – ४७ , तलाठी उत्पन्नाचे दाखले – १२६ , शपतपत्र – १३८, ७/१२ वाटप – ४७, दुय्यम शिधापत्रिका – ६९ , शिधापत्रिकेत नाव कमी व दाखल – ९७, आधार कार्ड काढणे व दुरूस्ती – ८७ , इतर दाखले आदी तयार करून देण्यात आले .

या शिबिराच्या यशस्वीते करिता तहसिलदार वरूणकुमार सहारे ,नायब तहसीलदार प्रेमकुमार आडे ,पुरवठा अधिकारी तितीक्षा बारापात्रे ,उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक, सभापती अजय लोंढे ,नगरसेवक राजेश यादव, राजेंद्र शेंदरे , नगरसेविका लक्ष्मी लाडेकर, राठोड बाबु ,संगायो अधिकारी लुटे बाबु,मंडळ अधिकारी कन्हान कांबळे ,तलाठी श्रीरसागर, धोपटे, कोतवाल बंडु वानखेडे , राजेश पाटील, चंद्रमणी वाहने, शालीक शेंडे ,गौतम राहुल सेतु केंद्राचे सतीश भसारकर, मनिष झोल्लर, शरद वाटकर, शेषराव बावने , प्रशांत कांळादे तहसिल व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी आदीने सहकार्य केले आहे .