Published On : Thu, Jun 27th, 2019

कन्हान ला महाराजस्व शिबीराचा नागरिकांनी लाभ घेतला

Advertisement

कन्हान : – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जुन महिन्यात हातातील कामे बाजुला करून विविध दाखल्यांसाठी धावपळ करावी लागते . तेव्हा त्यांना गावातच ही सेवा मिळवुन देण्याच्या उद्देशाने नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे यांच्या नेतृत्वात समाज भवन हनुमान नगर कन्हान परिसरात आयोजित राजस्व शिबीराचा कन्हान परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी भरपूर लाभ घेतला .

उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परिक्षेचा नुकतेच निकाल जाहीर झाले आहे. जुन महिन्या म्हणजे शेतकऱ्यांचा कामाचा तसेच पेरणीसाठी जुळवाजुळव करण्याकरिता अत्यंत धावपळीचे दिवस आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी शेतकरी व कामगार, पालकांना शेतीचे व आपले कामे बाजुला सारून इकडुन तिकडे धावाधाव करावी लागते. कधी कर्मचारी तर कधी अधिकारी हजर न मिळाल्यामुळे वेळ वाया घालवावा लागतो. अनेकदा निराश होऊनच परत यावे लागते .

Gold Rate
29 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,14,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अशावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय होऊ नये व त्यांना गावातच विविध दाखले मिळावे, या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशान्वये उपविभागीय अधिकारी रामटेक यांनी विभागीय स्तरावर राजस्व शिबीराचे आयोजन केले. पारशिवनी तालुक्यातील समाज भवन हनुमान नगर कन्हान परिसरात बुधवार दि.२६ जुन २०१९ ला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत राजस्व शिबीराचे आयोजन केले होते.

या शिबीरात तहसिलदार वरूण सहारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे यांच्या नेतृत्वाखाली जातीचे प्रमाणपत्र – ९७ , उत्पन्नाचे दाखले – ११८, अधिवास प्रमाणपत्र – ०७ , तलाठी उत्पन्नाचे दाखले – ११८ , दुय्यम शिधापत्रिका – ४५ , शिधापत्रिकेत नाव कमी व दाखल – २५ , आधार कार्ड काढणे व दुरूस्ती – ९७ , संगायो – २४ इतर दाखले आदी तयार करून देण्यात आले . या शिबिराच्या यशस्वीते करिता तहसिलदार वरूणकुमार सहारे , नायब तहसीलदार प्रेमकुमार आडे , पुरवठा अधिकारी तितीक्षा बारापात्रे ,नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका अनिता पाटील, संगायो अधिकारी लुटे बाबु , मंडळ अधिकारी कन्हान जगदीश मेश्राम , तलाठी महेंद्र श्रीरसागर, कोतवाल बंडु वानखेडे ,चंद्रमणी वाहने, सेतु केंद्राचे शिशुपाल बेंद्रे , योगेश नाहाले, शरद वाटकर, तहसिल व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी आदीने सहकार्य केले आहे .

Advertisement
Advertisement