Published On : Mon, Apr 27th, 2020

मुख्य न्यायाधीशांचा शपथविधी उद्या राजभवन येथे होणार

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा शपथविधी मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजता राजभवन, मुंबई येथे होणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी न्या़. दीपांकर दत्ता यांना पदाची शपथ देतील.

वर्तमान परिस्थिती विचारात घेऊन शपथविधीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांसह केवळ निवडक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.