Published On : Sun, Sep 17th, 2017

खाली पडलेल्या जिवंत विधुत ताराच्या स्पर्शाने दुपत्या म्हशीचा मुत्यु.

कन्हान: पुर्वेस ४ कि. मी. लांब गहुहिवरा येथील नाल्याजवळ जमिनीवर खाली पडलेल्या थ्री फेस विधुत जिवंत ताराच्या स्पर्शाने शॉक लागुन चरणा-या दुपत्या म्हशीचा जागीच मृत्यू झाला तर गुराखी सतर्कतेने बचावला. गहुहिवरा येथिल शेतकरी अशोक दशरथ राऊत वय ४६ वर्ष यांचे जनावर त्याचा नौकर रूपेश गजबे नेहमीचे प्रमाणे चारायला गावाबाहेर घेऊन गेला साडे चार वाजता च्या सुमारास गावाकडे जनावर चरत परत येताना गावाजवळील नाल्याजवळ कित्येक दिवसापासून थ्री फेस विधृत तारा जमिनीवर खाली पडलेल्या आहेत.

या तारात विधृत प्रवाह सूरू असल्यानेच काल शनिवार दि. १६ सप्टेंबर २०१७ ला म्हशीच्या ताराचा स्पर्शाने शॉक लागुन तारावर पडुन मुत्यु झाला. गुराखी रूपेश माणिकराव गजबे वय ३० वर्ष याने काय झाले म्हणून म्हशीच्या शेपटीला हाथ लावण्याचा प्रयत्न केला असता हाताला झनझन झाल्याने तेथुन पळ काढुन मालकाला सांगितले. मालक अशोक राऊत व गावकरी घटनास्थळी पोहोचुन पाहिले तर म्हशीच्या जागीच मृत्यू झाला असल्याने पोलीस पाटील दुर्योधन ठाकरेंनी कन्हान पोलीस स्टेशन ला कळविले .रविवार ला सकाळी ८. ३० वाजता कन्हानचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वानखेडे घटनास्थळी पोहोचुन म्हशीचे शवविच्छेदन केले. अशोक राऊत यांच्या या म्हशीने दहा दिवसांपुर्वीच छोटय़ाशा पिल्लाला जन्म दिला असल्याने पाळसाचा जगन्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.ही म्हश नऊ लिटर दुध देत असल्याने शेतक-यांचे ९० हजाराचे नुकसान झाले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गहुहिवरा येथे रविवार दि. १७ मार्च २०१७ ला गावाजवळील हनुमान मंदिराच्या मागील नाल्यात जिवंत विधृत तारा पडुन पाण्यात मासोळी पकडताना पुरूषोत्तम मेश्राम यांच्या शॉक लागुन मुत्यु झाला होता. तेव्हाच महावितरण कन्हान उपविभागीय अभियंता गावाबाहेर शिवारात झाडे पडुन खांब वाकुन विधृत तारा खाली पडलेल्या असल्याची माहिती दिली होती. तेव्हा अधिका-यांनी त्वरित दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनाची पुरतता झाली असती तर हा अपघात झाला नसता. यास्तव दोषी महावितरण च्या अधिका-यावर दंडात्मक कारवाई करून शेतकऱ्याचा झालेल्या नुकसानीचे भरपाई महावितरण कंपनीने दयावी अशी मागणी शेतकरी नेते संजय सत्येकार यांनी गावक-यांच्या वतीने केली आहे.

Advertisement
Advertisement