Published On : Wed, Jul 14th, 2021

बसपाने महागाईमुळे सरकार विरोधात निदर्शने केली

Advertisement

नागपुर – बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने केलेल्या आवाहना नुसार नागपूर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारच्या जनविरोधी नितीच्या विरोधात संविधान चौकात आज भव्य धरणे-निदर्शने केली. याचे नेतृत्व नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे, महासचिव नागोराव जयकर, प्रदेश कार्यालय सचिव उत्तम शेवडे, मनपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार यांनी केले.

निदर्शकांच्या वतीने नागपूर जिल्हाधिकारी मैडम च्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, ऊर्जामंत्री ह्यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील संविधानिक आरक्षण लागू करणे, राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या नोकरीतील साडेचार लाखाचा बॅकलॉग विशेष भरती अभियाना अंतर्गत भरणे, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण पूर्ववत ठेवणे, मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांचे आरक्षण पूर्ण भरणे, आरक्षण हा विषय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकणे, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करणे, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती कमी करुन त्यावर आळा घालणे, सरकारी कोरोनाच्या काळात शासनाच्या निर्बंधामुळे अनेकांना रोजगार व नोकऱ्या गमवाव्या लागल्या त्यांना सामावून घेणे, याच दरम्यान विद्युत विभागातर्फे रिडींग न झाल्याने सर्वसामान्यांचे थकीत विजबिल माफ करणे, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चानुसार भाव देणे, बी-बियाणे व रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतीवर प्रतिबंध घालने, गरजू शेतकऱ्यांना कर्ज देणे, काळा कायदा रद्द करणे, शंभर बिंदू नामावली नुसार विभाग स्तरावर प्राध्यापक भर्ती करणे. या वर्षीचे शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क माफ करणे, विद्यार्थ्यांना विनाविलंब शिष्यवृत्ती ची रक्कम देने, त्यांच्या वसतिगृह निवास व भोजनाची सोय करणे आदी प्रमुख लोकोपयोगी विषयांचा उल्लेख करण्यात आला.

धरणे-निदर्शने कार्यक्रमात विजय डहात, नितीन शिंगोळे, वंदना राजू चांदेकर, नरेंद्र वालदे, प्रवीण पाटील, अभय डोंगरे, जितेंद्र मेश्राम, सागर लोखंडे, नितीन वंजारी, महिपाल सांगोळे, सदानंद जामगडे, शिवपाल नितनवरे, मनोज निकाळजे, शशिकांत मेश्राम, रोशन शेंडे, सोमेश माटे, सुरेश गजभिये, विक्रांत मेश्राम, चंद्रशेखर पाटील, किशोर गेडाम, ताराचंद गोडबोले, रविंद्र गजभिये, शेखर चहांदे, राजेश फुलझेले, चंद्रशेखर कांबळे,

रंजनाताई ढोरे, सुनंदाताई नितनवरे, पुष्पाताई पाटील, सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे, संघमित्राताई बोरकर, कविता लांडगे, वर्षाताई साहारे, बबिताताई डोंगरवार, मायाताई उके, वैशाली अविनाश नारनवरे, रमा नागसेन गजभिये, करुणा मेश्राम,

पृथ्वी शेंडे, महेंद्र रामटेके, विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, महेश साहारे, योगेश लांजेवार, आदाब खान, प्रताप सूर्यवंशी, गौतम पाटील, संजय जैस्वाल, विकास नागभिडे, बुद्धम राऊत, उमेश मेश्राम, प्रणय मेश्राम, सुरेंद्र डोंगरे, मंगला राष्ट्रपाल वाघमारे, मंजुळा चौधरी, सविता सचिन पाटील, तेजस्विनी धुर्वे, अरुणा रंगारी, रक्षाताई सुखदेवे, रणजित सहारे, सुबोध साखरे, वीरेंद्र कापसे, उमेश पाटील, अनिल शाहू, सुबोध राऊत, नरेश वासनिक, प्रा परीक्षित कुमार, गौतम कांबळे, प्रकाश फुले, गौतम सरदार, प्रताप तांबे, शंकर थुल, वासुदेव मेश्राम, रोहित वालदे, आनंद सोमकुवर, सतीश पाणेकर, सहदेव पिलेवान, मनोज रंगारी, श्रीकांत बडगे, देवमन पखिडडे, सुनील कोचे, अजय डांगे, राजेंद्र सुखदेवे, अमन गवळी, नितीन सहारे, भिमराव राऊत, रवी मधूमटके, परेश जामगडे, अनिल मेश्राम, प्रीतम खडतकर, प्रफुल भांगे, मोहम्मद परवेज, आदी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी प्रामुख्याने सहभागी झाले होते.

धरणे निदर्शनाचा कार्यक्रम प्रदेश बसपा चे कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली दु 1 वाजेपासून 4 वाजेपर्यंत चालला. यात अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या जनविरोधी नितीवर ताशेरे ओढले. याचे सुत्रसंचालन जिल्हा सचिव अभिलेश वाहाणे ह्यांनी केले, शिष्टमंडळाची व पक्षाची भूमिका महासचिव नागोराव जयकार ह्यांनी सांगितल्यावर, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम ह्यांनी धरणे कार्यक्रमाचा समारोप केला.
भर पावसातही मोठ्या संख्येने बसपा कार्यकर्त्यांनी ओले होत -होत धरणे दिले.