Published On : Thu, May 30th, 2019

रेल्वे डब्यात कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

रेल्वे डब्यात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. ही घटना २१ मे रोजी इतवारी रेल्वे स्थानकावर उघडकीस आली. मात्र, अद्याप या मृतदेहाची ओळख पटली नाही. विशेष म्हणजे इतवारी लोहमार्ग पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासाठी प्रसार माध्यमांना माहिती दिली नाही.
लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार इतवारी रेल्वे स्थानकाचे उपस्टेशन व्यवस्थापकांनी २१ मे रोजी या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. नॅरोगेजच्या एका निरुपयोगी डब्यात महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. घटनास्थळी लोहमार्ग पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. मृतक महिला २० ते ३० वयोगटातील आहे. मृतदेहाच्या स्थितीवरून २० दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. बºयाच दिवसांपासून मृतदेह असल्याने कुजलेल्या स्थितीत होते. पंचनामा करताना पोलिसांना महिलेच्या डोक्याच्या केसात दोन क्लिप तसेच नाकात एक खडा घातलेला आहे.

६/७ वर्षापूर्वी अशाच प्रकारची एक घटना मोतीबागेत ठेवलेल्या बोगीत उघडकीस आली होती. दुर्ग वरून आलेली गाडी काही दिवस इतवारी रेल्वे स्थानकावर थांबली. त्यानंतर त्यातील एक बोगी इतवारीहून मोतीबागेत आली. येथे दुर्गंधी सुटल्यामुळे महिण्याभºयानंतर ही घटना उघडकीस आली होती. उपरोक्त घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. एका तरूणीचा मृतदेह आढळल्यानंतरही लोहमार्ग पोलिस याप्रकरणाविषयी गंभीर नाहीत याचे आश्चर्य वाटते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement