Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, May 30th, 2019
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  वृक्षलागवड मोहीम मिशन मोडवर राबवतांना लोकसहभाग वाढवा – सुधीर मुनगंटीवार

  33 कोटी वृक्षलागवड मोहीमेचा आढावा
  विभागात 5 कोटी 94 लक्ष, 56 हजार वृक्षलागवडीचे उददीष्ट
  झाडांचे जीवंत राहण्याचे प्रमाण 89.65 टक्के
  मिशनमोडवर मोहीम यशस्वी करा

  नागपूर: पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच वक्षाच्छादनाचे 33 टकके राष्ट्रीय उददीष्ट पुर्ण करण्यासाठी राज्यात 33 कोटी वृक्षलागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेला मिशनमोडवर राबवितांनाच लोकसहभाग वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.

  वनामती येथे नागपूर विभागातील 33 कोटी वृक्षलागवड मोहीमेचा आढावा वनमंत्री यांनी घेतला.या बैठकीला महापौर नंदा जिचकार,जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर,आमदार प्रा. अनिल सेाले ,आमदार सुधीर पारवे, आमदार रामदास आंबटकर ,चंद्रपूरच्या महापौर योगीताताई भोंडेकर वनविभागाचे सचिव विकास खारगे,विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार ,प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेश अग्रवाल, प्रधान मुख्यवनसंरक्षक वन्यजीव नितीन काकोडकर अतिरिक्त प्रधान मुख्यवनसंरक्षक बी.एस. हुड्डा, शैलेश टेंभुर्निकर, श्रीनिवास राव, कल्याण कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यपालन अधिकारी, विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

  33 कोटी वृक्ष लागवड ही मोहीम राज्यात यशस्वी करण्यासाठी विभागनिहाय आढावा घेण्यात येत असुन या मोहीमेला व्यापक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की नागपूर विभागासाठी 5 कोटी 94 लक्ष 56हजार एवढे उददीष्ट ठरविण्यात आले आहे.हे पूर्ण करण्यासाठी जील्हा निहाय नियोजन करण्यात आले असुन या मोहीमेला 1 जुलैपासुन आनंदवन येथुन सुरूवात होत आहे.विभागात वृक्ष लागवडीसाठी 4कोटी 3 लाख खडउे तयार करण्यात आले असुन वृक्षारोपनाची माहीती सर्वाना उपलब्ध्‍ व्हावी यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध्‍ करून देण्यात येत आहे.ही मोहीम अत्यंत पारदर्शकपणे तसेच वृक्षलागवडीबददल जनतेमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी कमांड रूम सुध्दा तयार करण्यात आली असल्याची माहीती त्यांनी यावेळी दिली.

  नागपूर विभागात मागील तीन वर्षापासुन ही मोहीम यशस्वी पणे राबविण्यात येत असल्याचे सांगतांना वनमंत्री म्हणाले की,या मोहीमेतील झाड जिवंत राहण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येते.पहील्या वर्षी 2 कोटी वृक्षलागवडीपैकी 81.36 टकके वृक्ष जिवंत आहेत.तसेच 2017 मध्ये 4कोटी वृक्षलागवडीपैकी 86.92 तर मागील वर्षी 13 कोटी वृक्षलागवड मोहीमेतर्गत 89.65 टकके वृक्ष जिवंत आहेत.

  वृक्षारोपण मोहीमेसोबतच लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगतांना वनमंत्री म्हणाले की सामाजिक उददेश समोर ठेवून मुलीच्या जन्माचे स्वागत करतांना कन्या वन समृध्दी योजनेच्या माध्यमातुन 10 झाडे देण्याचे धोरण स्विकारले आहे.यापैकी 5 झाउे ही सागाचे असुन इतर 5 झाडे फळवृक्ष आहेत.तसेच जिल्हा नियोजन मंडळ,आमदार निधी यामधुनही वृक्षारोपनासाठी निधीची उपलब्‍धता व्हावी म्हणुन शासन आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.यामुळे जिल्हास्तरावर मोठया प्रमाणवर वृक्ष लागवड मोहीम राबवायला सुरूवात झाली आहे.

  वनक्षेत्र असलेल्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी प्रमाणत असुन तेथे टॅकर लावण्याची आवश्यकता नसल्यामुळे दुष्काळ निवारणासाठी वृक्षारोपन महत्वाचे आहे.राज्यातील 483 ग्रामपंचायतीचा ग्रामसमृध्दी योजनेत समावेश करण्यात आले असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की बांबुचे क्षेत्र वाढविण्यासाठी बांबु मिशन राबविण्यात येत आहे.या मिशन मार्फत राज्यात 4 कोटी बांबु लावण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगीतले.

  वृक्ष लागवड हे जन आंदोलन व्हायला हवे. वृक्ष लागवड मोहिमेत मोठ्या प्रमाणात सर्व नागरिक सहभागी झाले तरच 33% हरित महाराष्ट्र मोहीम यशस्वी होवू शकेल. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया यांच्या २०१७ च्या सर्वेक्षण अहवालानुसार नागपूर जिल्ह्यातील वनाच्छादित क्षेत्र २०.४१ % आहे. तर वर्धा जिल्ह्यात हे प्रमाण १३.६८% आणि भंडारा जिल्ह्यात २४.६१ % एवढे आहे. गोंदिया जिल्ह्यात वनाच्छादित क्षेत्र ३६.७४%, चंद्रपूर जिल्ह्यात हे प्रमाण ३५.७२ एवढे आहे. गडचिरोलीमध्ये वनाच्छादित क्षेत्र सर्वाधिक असून हे प्रमाण ६९.४१ एवढे आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत मागील ३ वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

  वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट तसेच लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन व संगोपन केवळ वन विभाग करू शकत नाही. यामुळे नागरिक, खाजगी संस्था, शाळा, महाविद्यालये, तसेच शासनाच्या सर्व विभागांच्या बैठका घेण्यात येत आहे. नागपूर महसूल विभागांतर्गत ६ जिल्ह्यांसाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत एकूण ५९४.५५ लाख वृक्ष लागवडीचे नियोजन आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यासाठी ९८.३९ लाख, वर्धा ८७.५१, भंडारा ५४.००, गोंदिया ७८.८९, चंद्रपूर १६७.१६ तर गडचिरोली जिल्हयासाठी १०८.६० लाख वृक्षलागवडीचे नियोजन आहे. ३३ कोटी वृक्ष लागवडींतर्गत नागपूर महसूल विभागातील ६ जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे एकूण ५९४.५५ लाख उद्दिष्टांपैकी ५१४.३५ लाख रोपे कृत्रिम पुर्ननिर्मितीद्वारे लागवड व ८०.२० लाख रोपे नैसर्गिक पुनर्निर्मितीद्वारे संगोपन करण्यात येणार आहे .

  पर्यावरण संरक्षणाच्या या मोहिमेत राज्याच्या प्रत्येक नागरिकाला सहभागी करून घेण्याच्या हेतूने महाराष्ट्र हरित सेना या महत्त्वाकांक्षी उपक्रमात ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही मोहीम सन २०१७ पासून सुरू करण्यात आली असून नागपूर विभागात ७ लाख ६१ हजार १४९ सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र वनविभागाने वन संरक्षणासाठी नागरिकांचे संदेश, सूचना प्रशासनापर्यंत पोहचविण्यासाठी हॅलो फॅारेस्ट उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत १९२६ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध आहे .

  प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार यांनी नागपूर विभागातील 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासंदर्भात जिल्हा निहाय पाच कोटी 94 लाख 56 हजार वृक्षलागवडीच्या उददीष्टाबाबत माहिती दिली. प्रधान मुख्य वन संरक्षक उमेश अग्रवाल यांनी स्वागत केले.यावेळी जिल्हानिहाय मोहीमेचा आढावा घेण्यात आला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145