Published On : Sat, May 22nd, 2021

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या माजी नगरसेवक बंधूंचा चक्क मृतदेहच मिळाला

Advertisement

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोदी पडावं रहिवासी माजी नगरसेवक संतोष यादव यांचे मोठे बंधू नेहमीप्रमाने दुचाकीने कामावर गेले मात्र घरी परतलेच नव्हते यासंदर्भात सर्वत्र शोधाशोध घेऊनही कुठेही थांगपत्ता न लागल्याने शेवटी जुनी कामठी पोलीस स्टेशन गाठून हरवल्याची तक्रार नोंदविली तर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृतदेह हा कळमेश्वर-दहेगाव रेल्वे रुळाच्या कडेला आढळल्याची घटना काल 21 मे ला दुपारी 1 दरम्यान निदर्शनास आली.

तर पोलिसांनी अपघाती निधन ची नोंद केली असली तरी या प्रकरणात विविध चर्चेना पेव फुटले असून ही हत्या की आत्महत्या?याबाबत अजूनही संभ्रमता आहे तर या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मृतकाचा मृतदेहाच्या घटनास्थळपासून 1 किमी दूर अंतरावर त्याची दुचाकी असल्याने त्याचा घातपात झाला असावा अशीही शंका वर्तविण्यात येत आहे.या मृतक इसमाचे नाव निलेश यादव वय 48 वर्षे रा मोदी पडाव कामठी असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर मृतक हा मागील कित्येक वर्षापासून सेन्ट्रीग चे ठेकेदारी करीत असून सद्यस्थितीत कामठी तालुक्यातील कवठा येथील एका नवनिर्मित घरी काम सुरू होते तसेच इतरत्र ही चार ठिकाणचे सेंटरिंग कंत्राटी चे काम घेतले होते यानुसार दोन दिवसांपूर्वी सदर मृतक हा नियमितरीत्या कामावर जाण्यासाठी दुचाकीने सकाळी 10 वाजता घराबाहेर पडले मात्र सायंकाळ चे 7 वाजूनही घरी परतले नाही तर दुसरा दिवस उजळूनही घरी परतावा न झाल्याने घरमंडळींनी चिंता व्यक्त करीत त्वरित शोधाशोध केली मात्र कुठेही शोध लागला नाही यावर जुनी कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवून मिसिंग ची नोंद करून घेतली मात्र दुसऱ्या दिवशीच सदर मृतकाचा मृतदेह हा कळमेश्वर रेल्वे रुळाच्या बाजूला आढळला असून शरीरावर कुठेही जखम नसून फक्त चेहरा किरकोळ जखमी असल्याचे सांगण्यात येते तर दुचाकी दूर अंतरावर उभी असल्याने याबाबत शंका कुशंका व्यक्त करीत सदर मृतक साध्या स्वभावाचा असून कुठलेही व्यसन नाही तर कर्जही नसल्याने आत्महत्या करण्याचे कारणच उरत नाही तसेच मृतदेह इतक्या दूर अंतरावर मिळाल्याने या प्रकरणात घातपात झाला असावा अशी शंका व्यक्त करीत असल्याने पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करावा अशी मागणी मृतकाच्या कुटुंबियानो केली आहे.

घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पांचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत मृतकाच्या पार्थिवावर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात अपघाती मृत्यू ची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर मृतकाच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा आप्तपरिवार आहे.

संदीप कांबळे कामठी