Published On : Mon, Aug 5th, 2019

कामठेश्वर शिवमंदीरात भव्य कावड यात्रेसह श्रावणमासाची सुरूवात

कन्हान : – पाराशिवनी तहसिलार्नगत जुनिकामठी येथे सुवििख्यात भोसले कालिन कामठेश्वर शिव मंदिर येथे े पवित्र श्रावन महिन्याच्या पावन पर्वावर कामठेश्वर शिवमंदिर देव स्थान समिती जुनीकामठी व्दारे भव्य कावड यात्रेसह शिवशंकरांची शोभायात्रा काढुन कन्हान (कर्णिका), कोलार व पेंच नदीच्या त्रिवेणी संगमवार महाआरती व शिव महाजलाभिषेकांसह श्रावनमासाची सुरूवात करण्यात आली.

रविवार (दि.४) ऑगस्ट ला पवित्र श्रावन महिन्याच्या पावन पर्वावर दरवर्षी प्रमाणे कामठेश्वर शिवमंदीर देवस्थान समिती जुनी कामठी व्दारे सकाळी ११ वाजता गणेश मंदीर गोराबाजार येथे येरखडा, जुना गोदाम, जुनीकामठी येथील सर्व कावड धारी एकत्र येऊन भव्य कावड यात्रेसह भगवान शिवशंकरा ची भव्य शोभायात्रा काढुन मुख्य मार्गाने भ्रमणकरित कन्हान (कर्णिका), कोलार व पेंच नदीच्या त्रिवेणी संगमवार पोहचुन “चांगल्या प्रमाणात पाऊस होऊन भरपुर शेती पिक व्हावे आणि जगाचा पोशिंदा बळीराजा (शेतकरी) सुखी, समृध्द व्हावा याकरिता गंगेची महाआरती करून कावड मध्ये पवित्र जल घेऊन कामठेश्वर शिवमंदीर जुनीकामठी येथे १ वाजता भगवान शिवशंकराचे महाजलाभिषेक व विधिवत पुजा अर्चना, भजन करून व श्रीकृब्णा रामायण भजन मंडळ न्दारे संगीतमय सुन्दरकांडकर०यात आले रतर महाआरती करून प्रसाद बाटुन नतर दुपारी २ वाजता महाप्रसाद वितरण करून श्रावणमासा ची थाटात सुरूवात करण्यात आली.

या कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन भव्य कावड यात्रेचा व दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शिव मंदिर देवस्थान समिती जुनीकामठी अध्यक्षा जिजाताई आसोले, उपाध्यक्ष महादेव मामीलवार, बाबुलाल हिरणवार, युगचंद छललानी, प्रकाश सिरिया, विजय लांजेवार, वामन बल्की, सोनु पिल्ले, प्रफुल्ल जैन, राहुल कनोजिया, संजय शुक्ला, ब्रिजेद्र तिवारी, जुनीकामठी सरपंच मोहन खंडाते, उपसरपंच भुषण इंगोले, चंद्रशेखर आगुलेटवार, गज्जु श्रीवास, राजेश्वरी यादव, रितु जैन अङ प्रभुदयाल यादव ,नितेश यादव सह शिवमंदिर देवस्थान समिती जुनीकामठी च्या पदाधिकारी व सदस्यानी सहकार्य केले.