Published On : Mon, Dec 30th, 2019

सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच – महापौर

Advertisement

मनपा अधिकाऱ्यासोबत केला पाहणी दौरा

नागपूर: सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच करणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. सोमवारी (ता.30) महापौर संदीप जोशी यांनी स्थानिक नगरसेवक व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत सक्करदरा तलावाचा पाहणी दौरा केला व तेथील परिस्थिती जाणून घेतली.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी त्यांच्यासमवेत उपमहापौर मनीषा कोठे, नेहरूनगर नगर झोन सभापती समिता चकोले, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका रिता मुळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, कार्यकारी अभियंता (विद्युत) अजय मानकर, उप अभियंता रुपराव राऊत, कनिष्ठ अभियंता श्यामसुंदर ढगे, आर्किटेक्ट निशिकांत भिवगडे, कंत्राटदार ताहेर प्रामुख्याने उपस्थित होते.

महापौरांनी सक्करदरा तलावाची पाहणी केली. नव्या सौंदर्यीकरणासंदर्भातील सर्व माहिती कार्यकारी अभियंता अमीन अख्तर आणि निशिकांत भिवगडे यांनी दिली. यावेळी त्यांनी प्रस्तावित विकास कामांचे नकाशे महापौरांपुढे सादर केले. यामध्ये तलावाभवती संरक्षक भिंत, तलावाच्या एका बाजूस उद्यानात, एका बाजूस राजे रघूजी भोसले यांच्या जीवनावर आधारित म्युरल व त्यांचा जीवनपट असणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एका बाजूस फुट कोर्ट, प्रशस्त उद्यान असणार आहे. तलावाच्या सभोवताल चालणाऱ्यांसाठी जॉगिंग ट्रॅक तयार करणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यादेश देण्याच्या मार्गावर काम आहे. लवकरात लवकर कार्यादेश वितरित करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असे अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले.

सक्करदरा तलावासंदर्भात शासनाद्वारे अनेकवेळा पाठपुरावा करून निधी मागण्यात आला होता. तलवाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाद्वारे निधी आलेला आहे. आधीच उशीर झाला आहे, आता कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

तलावाच्या आतील स्वच्छतेच्यासंदर्भात काय उपाययोजना करता येईल याचाही विचार करण्यात यावा, असेही महापोरांनी सांगितले. तलावाच्या सभोवताल 7 ते 8 फुटाची सरंक्षक जाळी लावण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली, जेणेकरून तलावात कोणीही कचरा टाकणार नाही.

Advertisement
Advertisement