Published On : Thu, Jul 18th, 2019

रामटेक येथे दिवसाढवळ्या एक लाख रुपये असलेली पिशवी हिसकाऊन चोर पोबारा

रामटेक : समोर चाललेल्या दुचाकीवरील महिलेच्या हातातील एक लाख रुपये असलेली पिशवी मागून भरधाव वेगाने गाडी आणून पिशवी हिसकावून चोरांनी पोबारा केला. ही घटना रामटेक ते शीतलवाडीदरम्यान गौळण नाल्याजवळ मोरबी टाईल्स समोर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

परसोडा येथील बँक ऑफ इंडिया च्या शाखेत आल्यावर बँकेतून त्यांनी तीन वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या खात्यातून दीड लाख रुपये काढले.

Gold Rate
11 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,300 /-
Gold 22 KT ₹ 1,01,600 /-
Silver/Kg ₹ 1,25,200/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यावेळी ५0 हजार रुपये त्यांचा मुलगा सुनील गभणे याने आपल्या फुल पॅन्टच्या खिशात ठेवले व एक लाख रुपये फिर्यादी निर्मला गभणे यांनी आपल्याजवळील थैलीत ठेवून त्या व त्यांचा मुलगा सुनील गभणे हे दोघेही ही सुनीलचा मित्र विजय याच्या दुचाकीवरून रामटेकच्या दिशेने निघाले असता सुमारे साडेतीन वाजता गवळण नाल्याजवळ मोरबी टाईल्सच्या दुकानाच्या समोर बिना नंबरची काळ्या रंगाची पल्सर गाडी त्यावर दोघेजण स्वार असलेले मागून आले व चालत्या दुचाकीमधील सर्वात मागे बसून असलेल्या फिर्यादीच्या हातातील एक लाख रुपये असलेली थैली हिसकावून रामटेक बस स्थानकाच्या दिशेने वेगाने निघून गेले.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांनी सांगितले .पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सरकटे पुढील तपास करीत आहे .

Advertisement
Advertisement