| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 2nd, 2021

  ऑटो रिक्षा मेट्रो फिडर सर्विस म्हणून कार्य करणार

  – मेट्रो भवन येथे नागपूर जिल्हा ऑटो चालक- मालक महासंघची बैठक,मोबाईल ऍपच्या माध्यमाने ऑटोने प्रवास ठरवता येईल

  नागपूर– महा मेट्रोच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गावर प्रवासी सेवेमध्ये वाढ होत असून मोठ्या प्रमाणात नागरिक मेट्रोचा उपयोग करीत आहे. महा मेट्रोने तिकीट दरात ५०% सूट दिली असून जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रोचा उपयोग करावा हा मुख्य उद्देश्य आहे. याच पार्श्वभूमीवर मेट्रो भवन येथे आज नागपूर जिल्हा ऑटो चालक-मालक महासंघ संघटने सोबत संवाद साधण्यात आला.

  यावेळी महा मेट्रोच्या वतीने विस्तृत प्रस्तुतीकरण करण्यात आले.सदर संघटनेनी मेट्रो रेल प्रकल्पाशी फिडर सर्विस म्हणून कार्य करण्यासंदर्भातले निवदेन महा मेट्रो तसेच स्टेशन परिसरात ऑटो करिता योग्य पार्किंगची जागा देण्यासंबंधी निवेदन दिले. मेट्रो आणि ऑटो एक दुसऱ्याला स्पर्धा न करता एकमेकांना सहकार्य कश्या प्रकारे करू शकतील हे यावेळी सांगण्यात आले. चालक मालक ऑटो संघटनाचे सचिव श्री. चरणदास वानखेडे यावेळी उपस्थित होते.

  महा मेट्रोने नवीन उदयोनमूख कंपनी भारत राईड्स सोबत सामंजस्य करार (एमओयु) केला असून आहे. या ऍपच्या माध्यमातून ऑटो चालकांना तसेच प्रवाश्याना थेट त्यांच्या घरून ऑटो उपलब्ध होऊन शकेल व या माध्यमातून ते सहजपणे मेट्रो स्टेशन येथे पोहोचून मेट्रोने प्रवास करू शकतील. मेट्रोने प्रवास करणारा व्यक्ती या ऍपच्या माध्यमाने थेट स्टेशनच्या नजीक असलेल्या ऑटो रिक्षाशी संपर्क साधून पुढील प्रवास ठरवू शकतो.

  यामुळे ऑटो चालकांना प्रवासी जास्तीत जास्ती प्रवासी मिळतील. सदर ऍप पूर्णपणे निःशुल्क असून या करता ऑटो चालक तसेच प्रवाश्याना कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाही. सध्या १८ मेट्रो स्थानकांवरून (ऑरेंज आणि ऍक्वा लाईन) प्रवासी सेवा सुरु आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145