Published On : Tue, Feb 2nd, 2021

भाजपाचे महावितरणाविरोधात ताला ठोको व हल्लाबोल आंदोलन

Advertisement

महावितरणने राज्यातील 75 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे.

कोरोना तसेच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकरी आणि सामान्य जनतेला वीज बिल माफी न देता उलट त्यांच्या जगण्यावर घाला घालण्याचा प्रयत्न राज्यातील महाविकास आघाडी सरकार करीत आहे. अशा जनता विरोधी सरकारचा धिक्कार आणि महावितरणचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर ताला ठोको आंदोलन करण्यात येत आहे.

या अंतर्गत शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी, 2021 रोजी भाजपाने राज्यभर मंडलस्तरावरील महावितरण केंद्रांवर ` ताला ठोको व हल्लाबोल`आंदोलन आयोजित केले आहे.

या आंदोलनात भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व सामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.