Published On : Wed, Jul 8th, 2020

‘राजगृहा’वरचा हल्ला हा आंबेडकरी विचारांवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे.

काल रात्री मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर मनुवादी लोकांतर्फे केलेली तोडफोड म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि आंबेडकरी विचारांवर झालेला हल्ला आहे.

ह्या मनुवादी विचारांचा निषेध म्हणून आज बुधवार दिनांक ०८ जुलै २०२० रोजी ब्लॉक क्र. ९ काँग्रेस कमिटी तर्फे शहर काँग्रेस चे अध्यक्ष, आमदार श्री विकास भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व ब्लॉक अध्यक्ष श्री पंकज निघोट यांच्या नेतृत्वात माटे चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ तोंडावर काळे मास्क तसेच हातावर काळी रिबीन बांधून निषेध करण्यात आला व सोबतच दोषींना पकडून त्यांवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

निषेध कार्यक्रमात अजय नासरे, आकाश तायवाडे, नितीन बनसोड, चक्रधर भोयर, अभिजित जाधव, संजय तुरणकर, वैभव काळे, शुभम आमधरे, अभय सोमकुळे, आतिष झिंगरे, तुषार भागांनगरे, सुबोध सेवाइतुल, निलेश बागडे, मंगेश रहाटे, विनोद नाहे, मंगेश बडवेकर, हर्षद फलके, अतुल मेश्राम, राजू मते, सौरभ कडु, शंतनु उमरेडकर, कृष्णकांत मधूमटके, संजय सूर्यवंशी,अनिल उईके, प्रसाद बागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.