Published On : Sat, Aug 22nd, 2020

रामटेक शहरात हर्षोल्लासात घरोघरी झाले बाप्पांचे आगमन

Advertisement

गणपती बाप्पा मोर या च्या जयघोषात दुमदुमले रामटेक शहर

सार्वजनिक आयोजनावर कोरोणाचे ग्रहण…

Gold Rate
19 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,32,000 /-
Gold 22 KT ₹ 1,14,400 /-
Silver/Kg ₹ 1,55,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रामटेक : गणेशोत्सवानिमित्त शहरात दहा दिवसापर्यंत विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली असून अखेर श्री गणेश जी अवतरले..

कोरोना चा प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक आयोजन वर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे यावर्षी घरच्या घरीच गणेश उत्सव साजरा होईल विघ्नहर्ता चा आता या कोरोणाचा संकटातून सुटका करेल अशी आस भक्त लावून आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक योजनांवर काही प्रमाणात बंधने आली आहे तरी देखील लोकांचा उत्साह कमी दिसत नाही..बाजारात अनेक दुकानांवर अनेक प्रकारच्या मुर्त्या उपलब्ध होत्या तसेच इतर सजावटीचे साहित्य, फुलांची दुकाने लागली होती.

भाविकांनी आपल्या निरनिराळ्या मुर्त्या खरेदी केल्या . व गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात गणपती बाप्पांना स्थापना करण्यासाठी आपल्या घरी भाविकांनी गणपती बाप्पांची मूर्ती नेऊन स्थापित केली..

घरोघरी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. बच्चे कंपनी पासून तरुंतरूनि सह वृध्दांना सुद्धा या मंगलमय वेळेची वाट बघत असतात.
यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने सार्वजनिक गणेशुत्सवावर कोरोना चे सावट आले आहे . तरी देखील भाविकांमध्ये उत्साहाची कमी नाही वाटली. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषात विधिवत बाप्पांचा मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली.

गणपती बाप्पा या कोरोना च विनाश कर अशी प्रार्थना देखील भाविक बाप्पांना करत आहेत.

Advertisement
Advertisement