Published On : Sat, Aug 22nd, 2020

स्थायी समिती सभापती झलके यांनी केली आई जी आर ची पाहणी

नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती श्री विजय ( पिंटू ) झलके यांनी मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर ची आकस्मिक पाहणी शनिवारी केली. त्यांच्या सोबत आरोग्य समिती चे उपसभापती श्री नागेश सहारे, उपनेता श्रीमती वर्षाताई ठाकरे, नगरसेविका श्रीमती डॉ परिणीता फुके, आणि रुग्णालय चे इन्चार्ज डॉ किंमतकर सोबत होते. या रुग्णालयात कोविड 19 चे रुग्णांचा उपचार केला जात आहे.

श्री झलके यांनी सांगितले के एकूण व्यवस्था ठीक आहे पण एम डी मेडिसिन डॉक्टर ची नियुक्ती कोरोना रुग्णांनासाठी करणे गरजेचे आहे. झलके यांनी डॉक्टर ची व्यवस्था नसल्यावर नाराजी व्यक्त केली.

त्यांनी सांगितले की येथे एक्स रे ची पण व्यवस्था आहे. श्री झलके यांनी आरोग्य विभागाला अग्निशमन विभागाचा एन ओ सी घेण्याचे व टेलीफोन ची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.