Published On : Wed, Feb 14th, 2018

बंटी शेळके यांना ६४ युवक काँग्रेस कार्यकर्त्यांसह अटक : राजकीय दबावतंत्राचा वापर

Advertisement

नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रतिभा रघुवंशी व महाराष्ट्राचे प्रभारी अमित यादव यांच्या उपस्थितीत गांधी पुतळा चितारओळी येथे सरसंघचालक मोहन भागवत नी सैन्याबाबत केलेल्या विधानाबाबत निषेध मार्च करण्यात आला सर्व प्रथम संघाच्या रेशीमबाग येथील केशवद्वार पासून युवक काँग्रेसच्या दुचाकी रॅलीची सुरुवात झाली.रॅली ने संपूर्ण परिसर दनदनून गेला. मोहन भागवत चा निषेध करीत नारे देत रॅली महाल भागातून कल्यानेश्वर मंदिर मार्ग संघ मुख्यालयाकडून जात असताना पोलिसांनी पाठलाग केला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन युवक काँग्रेस कार्यकर्ते राम कूलर चौकातून गांधीगेट अग्रेसन चौक दवारा गांधीपुतळा चितारोळी जवळ पोहोचले पोहोचताच परमपूज्य महात्मा गांधी च्या पुतळ्याला माल्यार्पण केले. युवक काँग्रेसचे नेते कार्यकर्ते निषेध मार्च करीत संघ मुख्यालया कडे जात असतांना ६४ कार्यकर्त्यांना राजकीय दबावतंत्रापोटी अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या कार्यकत्या मध्ये सुशांत सहारे, नवेद शेख, अखिलेश राजन, आसिफ अन्सारी, स्वप्निल ढोके, जावेद शेख, अक्षय घाटोळे, बाबू खान, अक्षय हेटे, इम्रान पला,अलोक कोंडापुरवार, मुज्जू शेख, विशाल वाघमारे, फझलूर कुरेशी, नागेश जुनघरे,सागर चव्हाण, हेमंत कातुरे, राकेश बैरीसाल, हर्षल हजारे, फरदिन खान, सुबोध सवाईतुल, मनोज हसोरिया,गुड्डू भाई,पूजक मदने, अभिजित पवार, नितीन गुरव,मनोज धकाते व इतरही कार्यकर्ते यांना राजकीय दबावतंत्राचा वापर करून तहसील पोलिसांनी अटक केली

नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके म्हणाले की नोंदणी नसलेल्या सांस्क्रुतिक संघटनेचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले होते कीयुद्धाची तयारी करायला सैन्याला सहा महिने लागतील आमचे संघाचे स्वयम्सेवक तीन दिवसात तयार होतील असे घातक विधान करून देशातील शहिद झालेल्या सैनिकांचा व सैन्याचा अपमान केला नेहमीच वादग्रस्त विधान करनारे मोहन भागवत देशात उभी फूट पाडत आहे मागे त्यानी आरक्षनबाबत बेताल भाष्य केले तसेच महिलांबाबत अनुचित भाष्य करून विवाह संबंध हा कंत्राट आहे केव्हाही रद्द करू शकतो या भाष्याबद्दल मागे युवक कॉंग्रेस ने संघाची काळी टोपी व खाकी चड्डी जाळून त्याची राख जनचेतना यात्रा द्वारे गंगेत विसर्जीत करून निषेध केला कुठल्याही गोष्टीचा ताळमेळ न बाळगता बडबडनारे मोहन भागवत यांनी आता सैन्यालाही सोडले नाही यांना एवढाच विश्वास आपल्या स्वयंसेवकावर आहे तर झेड प्लस सुरक्षा कशाला घेता असा सवाल उपस्थित केला व ताबडतोब सुरक्षा वापस करावी स्वातंत्र्य पुर्व काळात स्वातंत्र्य मिळण्यासाठी कुठलेच योगदान न केलेली संघटना आता देशांत भीतीचे वातवरण निर्मित करून देशातील सौदर्य बिघडवत आहेत.

नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस ने मागणी केली आहे जोपर्यंत मोहन भागवत देशाची व सैन्याची माफी मागत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच ठेऊ. आजच्या आंदोलनात राजेंद्र ठाकरे, स्वप्निल बावनकर,वसीम शेख, जुनेद शेख, शाबाज सिद्दीकी, सौरभ शेळके, रोशन पंचबुद्धे,अंकित गुंमगावकर,तेजस मून, राहुल जैस्वाल,निलेश तलवारे,इब्राहिम पठाण,मौसीम खान, परेश रंभाड, सोनू मोऊंदेकर,शेख अझर, विजू हाथबुडे, दिवाकर पलांदुरकर,तुषार मदने, प्रफुल शनिवारे,श्रेयस मोटघरे,विक्की नटिये, निखिल वांढरे, विजय मिश्रा, नेहान खडेरवार असे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.