Published On : Wed, Sep 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील मेडिकलच्या अमृतमहोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते १ डिसेंबरला होणार

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ७५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने अमृतमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाची सांगता २२ व २३ डिसेंबर २०२३ रोजी होईल, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता व अमृतमहोत्सवाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राज गजभिये यांनी पत्रपरिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला आयोजन समितीचे सचिव डॉ. सुधीर नेरळ, उपअधिष्ठाता डॉ. उदय नारलावार, उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, डॉ. विंकी रुघवानी, डॉ. अविनाश रोडे, डॉ. अर्चना देशपांडे व डॉ. अविनाश गावंडे उपस्थित होते. या अमृतमहोत्सवाचे स्वागताध्यक्षपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आहे. त्यांच्या नेतृत्वात हा सोहळा पार पडणार आहे.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हा सोहळा २३ दिवस चालणार असून यादरम्यान परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. इतकेच नाही तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर यांनाही अमृतमहोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने सरकारने मेडिकलला ५१४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे.

Advertisement
Advertisement