महापौरांनी केली पाहणी
नागपूर : मोमिनपुरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवनाचे नूतनीकरण, फर्नीचर खरेदी व इतर विकास कार्याकरीता महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी रु. १० लक्ष देण्याची घोषणा शुक्रवारी (११ जून) रोजी केली. महापौरांनी सांगितले की समाज भवनाच्या विकास कार्यासाठी निधी ची कमतरता पडू देणार नाही. राशिचे प्रावधान मनपाच्या अर्थसंकल्पात केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महापौरांनी सकाळी आंबेडकर समाज भवनाला भेट दिली. या समाज भवनाचे नूतनीकरण करण्यासाठी नगरसेवक श्री. धर्मपाल मेश्राम यांनी निधी देण्याची मागणी बजट भाषणाच्या दरम्यान केली होती.
महापौरजींच्या पाहणी दौरा प्रसंगी गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, माजी सत्तापक्ष नेते श्री. संदीप जाधव, नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम, रिपब्लिकन आघाडीचे संयोजकद्वय ज्येष्ठ नेते हरीदास टेंभुर्णे व दिनेश गोडघाटे, सहा. आयुक्त अशोक पाटील आदि उपस्थित होते.
या प्रसंगी हरीदास टेंभुर्णे यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांचे पुष्पगूच्छ देवून स्वागत केले व आभार मानले.
