Published On : Sat, Aug 17th, 2019

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांचे विमानतळावर आगमन व स्वागत

नागपूर: राष्ट्रपती श्री रामनाथ कोंविद व श्रीमती सविता कोंविद यांचे आज भारतीय वायूदलाच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 10 वाजता आगमन झाले. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मा. राष्ट्रपती यांचे स्वागत केले.

यावेळी महापौर नंदा जिचकार, एअर मार्शल आरकेएस सक्सेना, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वागत केले. विमानतळावरील स्वागताचा स्वीकार केल्यानंतर मा. राष्ट्रपती यांचे भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने वर्धा येथील कार्यक्रमासाठी येथून प्रयाण झाले.