कन्हान : – ब्रिटिश काळीन कन्हान नदी च्या पुलाची वयोमर्यादा संपल्याने पुल कात टाकत असुन सुध्दा बिनधास्त जड वाहनाच्या वाहतुकीने एक एक दगड, रेलींग पडत आहे तरी प्रशासन ना जड वाहतुकीवर लगाम, ना दुरुस्ती कडे लक्ष देत नसल्याने मोठय़ा अपघाताची किंवा पुल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता संबंधित प्रशासन विभाग व अधिकारी हयानी त्वरित लक्ष केंद्रित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
काश्मीर ते कन्याकुमारी ला जोडणारा नागपुर ते जबलपुर राष्ट्रीय माहामार्ग क्र ४४ वरील कन्हान नदीचा ब्रिटिश काळा तील जुन्या पुलाची वयोमर्यादा संपली असताना नविन पुलाचे निर्माण काम मागील पाच वर्षापासुन कासव गतीने सुरू असल्याने जुन्याच पुलावरून जड वाहतुकीस प्रतिबंधक असताना सुध्दा बिनधास्तपणे दहाचाकी, बाराचाकी व त्या पेक्षा जास्त चाकी ट्रक, ट्रॅवल्स, बसेस, गाड्या आदी जडवाहतु सुरू असल्याने जुना पुल कात टाकत आहे.
वाहनाच्या धडकेत किंवा हाद-याने कधी कधी, एक – एक पुलाचा दगड पडतो तर पुलाच्या बाजुला रेलींग सुध्दा पडत असल्याने एखादे वाहन नदीत पडुन अपघात होऊ शकतो. तसेच वाहनाच्या मोठय़ा अपघाताने पुलाला हादरा बसुन पुल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता संबंधित प्रशासनाच्या विभागाने व अधिका-यांनी जड वाहतुकी वर प्रतिबंध लावुन पुलाची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी अशी मागणी युवा
सामाजिक कार्यकर्ता ऋृषभ बावनकर , प्रविण गोडे, चंदन मेश्राम, हरीओम प्रकाश नारायण, सचिन यादव, सुरेश देवांगन, प्रकाश कुर्वे, अक्षय फुले सह नागरिकांनी केली आहे.

